Virat Kohli : एकच चूक वारंवार करून Out होतोय विराट कोहली, सोशल मीडियावर Troll

Virat Kohli : एकच चूक वारंवार करून Out होतोय विराट कोहली, सोशल मीडियावर Troll
Virat Kohli

जागतिक क्रिकेटमध्ये किंग कोहली (Virat Kohli) हे एक नाव आहे. कारण हा फलंदाज त्याच्या चुकांमधून शिकत असे आणि आता काळ आणि हवामानानुसार कोहलीतही बदल झालाय. सोशल मीडियावर #Kohli टॉप ट्रेंडमध्ये आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रदीप गरड

Dec 29, 2021 | 9:01 PM

मुंबई : जागतिक क्रिकेटमध्ये किंग कोहली (Virat Kohli) हे एक नाव आहे. कारण हा फलंदाज त्याच्या चुकांमधून शिकत असे आणि आता काळ आणि हवामानानुसार कोहलीतही बदल झालाय. म्हणजेच कोहली त्याच्या चुकांमधून शिकायचा, आता तो पुन्हा पुन्हा त्याची पुनरावृत्ती करतोय. कारण दोन वर्षे उलटली तरी विराट कोहलीच्या बॅटमधून एकही शतक झळकलेलं नाही.

Top Trendमध्ये विराट
सेंच्युरियन कसोटीबद्दल बोलायचं झालं तर विराट कोहलीनं दोन्ही डावात सारखीच चूक केली आणि दोन्ही वेळा निकाल फ्लॉप झाला. पहिल्या डावात 10व्या यष्टीच्या चेंडूला फटकावण्याच्या प्रयत्नात विराटनं विकेट गमावली आणि दुसऱ्या डावात तो 8व्या स्टंपचा चेंडू ड्राइव्ह करायला गेला. परिणामी डाव 10 धावांवर संपुष्टात आला. सोशल मीडियावरही #Kohli टॉप ट्रेंडमध्ये आहे. चाहते आणि माजी दिग्गज सोशल मीडियावर यावर कमेंट्स देत आहेत.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की विराट कोहली गेल्या 3 वर्षांत 11 ड्राइव्ह फटका मारताना बाद झालाय. कसोटी फॉरमॅटमध्ये पुन्हा पुन्हा त्याच पद्धतीनं बाद होणं, ही खरोखरच चिंतेची बाब आहे. विराट कोहलीच्या शतकाचा दुष्काळ संपण्याची लोक वाट पाहात आहेत, पण अशा चुकीमुळे ते होणार नाही, असं दिसतय.

IND VS SA: विराटाच्या शॉट सिलेक्शनवर गावस्करांनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, म्हणाले….

Marco Jansen| रोहितच्या मित्रानेच घेतली विराटची विकेट, 3 वर्षापूर्वीही केलं होतं हैराण

Sourav Ganguly: हॉस्पिटलने दिली बीसीसीआय अध्यक्षांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें