…अन् अचानक कारमध्ये झाला स्फोट; CNG पंपावरचा धक्कादायक Video viral, कारचा खुळखुळा

CNG Car blast : पेट्रोल कारसोबतच CNG (Compressed Natural Gas) कारची मागणीही देशात वाढत आहे. एका सीएनजी कारचा सीएनजी पंपावर स्फोट (Blast) झाला आहे. एक व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) झाला आहे. यामध्ये अचानक कारचा स्फोट होतो, असे दिसत आहे.

...अन् अचानक कारमध्ये झाला स्फोट; CNG पंपावरचा धक्कादायक Video viral, कारचा खुळखुळा
सीएनजी कारमध्ये झाला स्फोट
Image Credit source: Youtube
प्रदीप गरड

|

Mar 24, 2022 | 7:30 AM

CNG Car blast : पेट्रोल कारसोबतच CNG (Compressed Natural Gas) कारची मागणीही देशात वाढत आहे. चांगले मायलेज मिळाल्यामुळे बहुतेक लोक सीएनजी कारची निवड करत आहेत. कंपनी-फिट केलेल्या सीएनजी कार सर्व पॅरामीटर्सवर चाचणी केल्यानंतरच ऑटोमेकर्स लॉन्च करतात. पण बाजारातून विकत घेऊन सीएनजी किट बसवणे अत्यंत हानिकारक आहे. याशिवाय सीएनजी गाड्यांबाबतही मोठी काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा कधीही अपघात होऊ शकतो. असाच एक अपघात झाला आहे. एका सीएनजी कारचा सीएनजी पंपावर स्फोट (Blast) झाला आहे. एक व्हिडिओ (Video) व्हायरल (Viral) झाला आहे. यामध्ये अचानक कारचा स्फोट होतो, असे दिसत आहे. स्फोट कशामुळे झाला हे तर स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र सीएनजी कीट असलेली ही कार नंतर खिळखिळी झालेली पाहायला मिळत आहे.

कारच्या मागच्या बाजूची दुरवस्था

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, की एक कार सीएनजी पंपावर आलेली आहे. तिच्यात गॅस भरणे सुरू असते. पंपावरचा कर्मचारी दिसत आहे. तर कारच्या शेजारी कारचा मालक असावा. अचानक कारच्या मागच्या बाजूने स्फोट होतो. त्यानंतर दोघेही लांब पळून जातात. नंतर पुन्हा काय झाले, ते पाहण्यासाठी येतात. तोवर कारच्या मागच्या बाजूची स्फोटामुळे दुरवस्था होते. हा व्हिडिओ कुठला आहे, हे समजू शकले नाही. तर कारमध्ये कोणी बसले होते का याचीही माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, व्हिडिओवर दिलेल्या तारखेनुसार हा 16 मार्चचा असल्याचे दिसत आहे.

कशामुळे होऊ शकतो स्फोट?

इंधन टाकी ओव्हरफिलिंग, अयोग्य फिटिंग आणि कालांतराने हळूहळू गळती अशा अनेक कारणांमुळे कारमध्ये CNG गळती होऊ शकते. गळतीवर ताबडतोब शोध घेणे आणि नंतर अधिकृत सेवा केंद्राकडून त्यावर उपाय करणे गरजेचे असते.

आणखी वाचा :

सफाई ‘अशी’ काही केली, की नगरसेवकाला नायक सिनेमाप्रमाणं घातली दुधानं अंघोळ, Video viral

रस्त्यावरून चालणाऱ्यांसोबत केला असा काही प्रँक, महिलांचे खावे लागतायत बोलणे; Video viral

Ice skating : एकाचवेळी स्केटिंग आणि बॅकफ्लिप, तेही बर्फावर..! पाहा, मुलीचा Viral video

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें