AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : मांजरीला वाचवायला गेली दोन छोटी मुलं, काय घडलं बघा

Viral Video : नन्हे हाथ, बड़ा दिल...' छतावर अकडलेल्या मुक्या जीवाला सुरक्षित खाली उतरवण्याचा या दोन्ही लहान मुलांचा प्रयत्न आपल्याला बरच काही शिकवतो. वय कितीही असो, मदत करण्याची इच्छा सर्वात महत्वाची असते.

Viral Video : मांजरीला वाचवायला गेली दोन छोटी मुलं, काय घडलं बघा
Cat Video
| Updated on: Aug 26, 2026 | 4:43 PM
Share

संकटात अडकलेल्यांना मदत करणं हा मानवता धर्म आहे. पण सध्याच्या जमान्यात माणूस स्वार्थी बनत चालला आहे. त्याला स्वत:पलीकडे फार काही दिसत नाही. माणूस सर्वात आधी स्वत:चा विचार करतो, नंतर दुसऱ्यांचा. रस्त्यावरुन चालताना एखादा माणूस चक्कर येऊन खाली पडला किंवा एखाद्याला अपघात झाला, तर त्याला मदत करणारे फार थोडे असतात. उलट अपघातानंतर किंवा एखादी अप्रिय घटना घडल्यानंतर मदत करण्याऐवजी त्या घटनेचं व्हिडिओ शूटिंग करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अपघाताच्या किंवा हल्ल्याच्या व्हायरल होणाऱ्या सोशल मीडियावरील व्हिडिओमधून हे दिसून येतं. त्यावेळी आपल्याला प्रश्न पडतो की, कोणी मदतीसाठी का पुढे आलं नाही? अनेकांना आपल्या कर्तव्याचा विसर पडत चालला आहे. मदतीसाठी पुढे येणारे हात कमी होत चालले आहेत.

सध्या असाकाळ आहे, समोरच्याला सहज मदत करता येणं शक्य असतं, पण त्रास नको म्हणून पळ काढणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आपल्याच माणसाला संकटात सोडून लोक निघून जातात. आजच्या जमान्यात इथे माणूस माणसाला मदत करत नसताना लहान मुलांचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप काही शिकवून जाईल. यात खूप वेगवेगळे अर्थ दडलेले आहेत. एका छोट्याशा मांजरीसाठी या दोन लहान मुलांनी जे केलं, त्याला तोड नाही. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी ही मांजर घराच्या छतावर चढली होती. पण खाली उतरण्याचा तिला मार्ग मिळत नव्हता. खाली उतरताना पडण्याचा धोका असल्यामुळे ती मांजर सुरक्षित मार्गाच्या शोधात छपरावर फिरत होती. अखेर तिथे असलेल्या दोन मुलांनी या मुक्या जीवाला मदत केली.

वय कितीही असो, मदत करण्याची इच्छा सर्वात महत्वाची

त्या मांजरीला घराच्या छतावरुन खाली उतरता यावं, यासाठी एका मुलाने बाकडा उचलून छपराला लावला. जेणेकरुन त्या बाकड्याला खाली उतरण्याचा योग्य मार्ग समजून मांजरीने खाली यावं. त्यावेळी दुसरा मुलगा बाकडा जिथे संपतो तिथे हातात एक छोटी बादली घेऊन उभा राहिला. मांजर त्या बाकड्यावरुन घसरत खाली आली व त्या बादलीत जाऊन पडली. त्या मांजरीचे प्राण वाचवल्याचा आनंद त्या दोन्ही मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. उत्तराखंड पोलिसांनी तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

उत्तराखंड पोलिसांनी हा व्हिडिओ पोस्ट करताना एक संदेश दिले आहे. ‘नन्हे हाथ, बड़ा दिल…’ छतावर अकडलेल्या मुक्या जीवाला सुरक्षित खाली उतरवण्याचा या दोन्ही लहान मुलांचा प्रयत्न आपल्याला बरच काही शिकवतो. वय कितीही असो, मदत करण्याची इच्छा सर्वात महत्वाची असते. गरजवंतांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहा असं उत्तराखंड पोलिसांनी म्हटलं आहे.

Follow Us
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?