Chicken fly Viral Video : हवेत ‘अशी’ लांब आणि उंच उडणारी कोंबडी कधी पाहिली नसेल

प्रदीप गरड

Updated on: Jan 31, 2022 | 8:00 AM

असे काही पक्षी (Bird) आहेत जे पंख असूनही उडू शकत नाहीत. यामध्ये कोंबड्यांचा(Hen)ही समावेश आहे. पण आजकाल असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला प्रश्न पडेल, की हे कसं शक्य आहे? तुम्हीही हा व्हिडिओ पाहिल्यास आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाहीत. मनोरंजक पण आश्चर्यकारक असा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल होतोय.

Chicken fly Viral Video : हवेत 'अशी' लांब आणि उंच उडणारी कोंबडी कधी पाहिली नसेल
हवेत उंचावर उडणारी कोंबडी

Chicken fly : पंख असलेल्या किंवा उडणाऱ्या कोणत्याही प्राण्याला पक्षी (Bird) म्हणतात हे तुम्हाला माहीत असेलच. पक्षी सहजपणे उडू शकतात आणि अगदी उंच पर्वत पार करू शकतात. असे काही पक्षी (Bird) आहेत जे पंख असूनही उडू शकत नाहीत. यामध्ये कोंबड्यांचा(Hen)ही समावेश आहे. त्यांना पंख आहेत, परंतु ते कमी उंचीवर आणि थोड्या अंतरावर उडू शकतात. ते त्यांच्या पंखांनी लांब उडू शकत नाहीत. पण आजकाल असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला प्रश्न पडेल, की हे कसं शक्य आहे? तुम्हीही हा व्हिडिओ पाहिल्यास आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाहीत. हा व्हिडिओ एका कोंबडीचा आहे, जी लांब उडताना दिसत आहे. एवढ्या लांब उडणाऱ्या कोंबडीला तुम्ही क्वचितच पाहिलं असेल. मनोरंजक पण आश्चर्यकारक असा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया(Social Media)वर व्हायरल होतोय.

पक्ष्याप्रमाणं करते पंखांचा वापर

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक कोंबडी धावत असताना काही अंतरापर्यंत धावते आणि नंतर तेथून उडण्याचा प्रयत्न करते. मग ती तिच्या पंखांच्या साहाय्यानं उडायला लागतं आणि उडत उडत खूप पुढे जाते. तिला उडताना पाहून ती कोंबडी आहे, असं वाटत नाही, तर दूरवर उडणाऱ्या पक्ष्याप्रमाणं ती पंखांचा वापर करते. जरी तिला उंच उडता येत नसलं तरी ती लांब उडण्याचा प्रयत्न करतेय. सहसा कोंबडी फक्त काही मीटर उडण्यास सक्षम असते, परंतु यामध्ये, कोंबडी बरंच मीटर पुढे उडताना दिसतेय.

ट्विटरवर शेअर

हा आश्चर्यकारक व्हिडिओ @buitengebieden_ या नावानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे आणि ‘आतापर्यंत कोंबडी उडू शकते हे कधीच माहीत नव्हतं’ असं कॅप्शन लिहिलं आहे. 52 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 2.5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 13 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइकही केलं आहे.

मजेशीर कमेंट

व्हिडिओ पाहून अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूझरनं लिहिलं आहे, की मलाही हे माहीत नव्हतं’, तर दुसऱ्या यूझरनं ‘खूप छान’ अशी कमेंट केली आहे. माझी कोंबडी इतकी लठ्ठ आहे, की ती इतक्या लांब उडू शकत नाही, असं म्हटलंय.

आणखी बातम्या

थंडीनं कुडकुडत होती चिमुरडी, देवदूत बनून एकानं केली मदत; हृदयस्पर्शी Video Viral

Viral : दोन इमारतींवरून कशी मारली उडी? Videoमध्ये पाहा excellent Jump

घरात घुसला कोब्रा, वाचवण्यासाठी गेलेल्या सर्पमित्रावरच करतोय हल्ला, पाहा Viral Video

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI