AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनचा रोबोट डॉगने शत्रूचे काम तमाम, व्हिडिओ समोर येताच जगभरात दहशत

China Assault Rifle Robot Dog: अनेक मीडिया रिपोर्टाने दावा केला आहे की, रोबोटिक डॉग्सला चीनमधील स्टार्टअप कंपनी यूनीट्री रोबोटिक्सने तयार केला आहे. परंतु या कंपनीने चीनची पीपुल्स लिब्रेशन आर्मीला रोबट डॉगचा पुरवठा करण्यास नकार दिला आहे.

चीनचा रोबोट डॉगने शत्रूचे काम तमाम, व्हिडिओ समोर येताच जगभरात दहशत
| Updated on: Feb 22, 2025 | 3:15 PM
Share

चीनचा रोबोट डॉग आणि ड्रोनची फायटींग याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. चीनच्या पीपुल्स लिबरेशन आर्मीने न्यूक्लियर, बायोलॉजिकल आणि केमिकल डिफेन्स ड्रिल केली. त्यामध्ये यूएव्ही आणि रोबोटिक डॉगचे प्रदर्शन केले. संरक्षण क्षेत्रात देशाला पुढे नेण्यासाठी चीन आता रोबोटिक डॉगवर फोकस करत आहे. रोबोटिक डॉग शत्रूंचा खात्मा करण्यासोबत जवानांना शहीद होण्यापासूनही वाचवणारा ठरणार आहे. मागील वर्षी चीनच्या लष्कराने रोबोटिक डॉगची माहिती दिली होती.

चीन आणि कम्बोडिया यांची संयुक्त लष्करी सरावाचा एक व्हिडिओ जारी करण्यात आला. त्या व्हिडिओतून रोबोट डॉगची क्षमता दाखवण्यात आली. म्हणजे जवानांना पर्याय म्हणून रोबोट डॉग तयार केला जात आहे. शत्रूंच्या घरात घुसून हे रोबोट डॉग हल्ला करु शकतील. थोडक्यात चीन आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लष्कराला मजबूत करत आहे. हायटेक अनमॅन्ड एरियल व्हीकल आणि रोबोट डॉग त्याचे उदाहरण आहे.

काय आहे वैशिष्टये

चीनचे रोबोट डॉग चलू शकतात तसेच धावूसुद्धा शकतात. गरज पडल्यावर उड्या मारु शकतात. ते असॉल्ट रायफलसुद्धा चालवतात. चीनी लष्कराकडे दोन प्रकारचे रोबोट डॉग आहे. पहिला डॉग जास्त पॉवरफुल आहे. तो असॉल्ट रायफलने सुसज्य आहे. 50 किलो वजनाचा हा डॉग आपल्या लक्ष्याचा मागोवा घेताना आपली परिस्थिती देखील बदलतो. त्याचे टार्गेट त्याची जागा बदलत असेल, तर तोही जागा बदलत आपले टार्गेट अबाधित ठेवतो. दुसऱ्या रोबोट कुत्र्या डॉगचे वजन 15 किलो आहे. हे शत्रूची हेरगिरी करण्यासाठी आणि काही विशिष्ट गोष्टी शोधण्यासाठी वापरले जाऊ शकते. विशेष म्हणजे दोन्ही डॉग 4D वाइड अँगल पर्सेप्शन सिस्टमसह कार्य करतात. परिस्थितीनुसार ते त्यांच्या चालीही बदलतात.

कोणी बनवला रोबोटीक डॉग?

अनेक मीडिया रिपोर्टाने दावा केला आहे की, रोबोटिक डॉग्सला चीनमधील स्टार्टअप कंपनी यूनीट्री रोबोटिक्सने तयार केला आहे. परंतु या कंपनीने चीनच्या पीपुल्स लिब्रेशन आर्मीला रोबट डॉगचा पुरवठा करण्यास नकार दिला आहे. यामुळे चीनी आर्मीने त्यांना हे रोबोटिक्स डॉग कुठून मिळत आहे, त्याची माहिती दिली नाही.

चीनच्या रोबोटीक डॉगचे प्रदर्शन मागील वर्षी गोल्डन ड्रैगन 2024 एक्सरसाइजमध्ये करण्यात आले होते. चीन आणि कम्बोडियाने मिळून हे संयुक्त लष्करी सराव 16 ते 30 मे 2024 दरम्यान केले होते. यावेळी चीनी लष्कराने आपली ताकद दाखवली. तसेच अत्याधुनिक शस्त्र दाखवत आपल्या शक्तीचा परिचय करुन दिला. आता चीन रोबोटीक डॉग पुन्हा चर्चेत आले आहे. मागील महिन्यात चीनने लष्करी सराव केला. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.