Video : सिगारेट ओढणाऱ्यांनी हा व्हिडिओ पाहाच, सिगारेट सोडून द्याल

Video : सिगारेट ओढणाऱ्यांनी हा व्हिडिओ पाहाच, सिगारेट सोडून द्याल

एक इसमाने सिगारेट ओढली आणि रस्त्यावरील एका खड्ड्यात फेकली आणि त्यानंतर केवढा मोठा स्फोट झाला ते तुम्हीच बघा.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Dec 26, 2021 | 8:47 AM

मुंबई : सिगारेट ओढण्याचे आरोग्यावर तर घातक परिणाम होतच असतात, मात्र त्याचे इतरही काही मोठे दुष्परिणाम होतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक छोटीशी चूक किती महागात पडू शकते याचा अंदाज तुम्हाला येईल. हल्ली सिगारेट ओढणे म्हणजे जणू फॅशनच झाली आहे, सिगारेट ओढायची आणि त्याचा जळता तुकडा कुठेही पेकायचा, मात्र त्यानंतर काय होतंय तुम्हाला हा व्हिडिओ पाहून कळेल. कारण असेच एक इसमाने सिगारेट ओढली आणि रस्त्यावरील एका खड्ड्यात फेकली आणि त्यानंतर केवढा मोठा स्फोट झाला ते तुम्हीच बघा.

काही लोक सिगारेट ओढतात आणि ती न विझवताच फेकून देतात. सिगारेट व्यवस्थित विझवणे गरजेचे असते. तसे न केल्यास मोठ्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सिगारेट रस्त्यावर फेकताना दहावेळा विचार कराल, काही लोक तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सिगारेट ओढणेही सोडून देतील.

सिगारेट फेकल्यानंतर मोठा स्फोट

या व्हिडिओत एक व्यक्ती सिगारेट ओढत येते. सिगारेट संपताच निष्काळजीपणाने ती तशीच जळती सिगारेट रस्त्यावरील एका खड्ड्यात फेकून देते. त्यानंतर जे झालं ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल. कारण त्या व्यक्तीने जशी जळती सिगारेट रस्त्यावरील एका खड्यात फेकली त्यावेळीच तिथे एक मोठा स्फोट झाला, हा स्फोट एवढा मोठा होता की जमिनीलाही भला मोठा खड्डा पडतो. त्या स्फोटात ती व्यक्तीही कुठे पडते हे त्यालाही काही काळ सुधारत नाही. त्यात ती व्यक्ती गंभीर जखमी झाल्याचेही दिसून आले आहे. या व्हिडिओत त्याची अवस्था पाहिली तर त्याला धड निट उटताही येत नाही, एवढा प्रचंड मोठा हा स्फोट आहे. या व्हिडिओत ही व्यक्ती थोडक्यात बचावली आहे, नाहीतर त्याच्या जीवावर बेतण्याची जास्त शक्यता होती. नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून जमिनीखाली गॅस पाईपलाऊन असावी असा अंदाज लावला आहे. त्यामुळेच हा ब्लास्ट झाल्याच्या चर्चा आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Meme wala (@memewalanews)

सिगारेट कुठेही फेकून देणे बंद करा

आपल्याकडे नाक्यावर, टपरीवर, रस्त्यावर अनेकजण सिगारेट पिताना दिसून येतात. त्यातले बहुतांश लोक सिगारेट जळती फेकून देतात. अशा लोकांना तर याचा धोका आहेच, मात्र इतर लोकांनाही यामुळे गंभीर धोका होऊ शकतो, हे लक्षात घेण्याची गरज आहे. त्यामुळे जळती सिगारेट कुठेही फेकू नका, नाहीतर अशा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. यात जीवावर बेतण्याचीही शक्यता असते.

जेलमधून दोनदा पळाला, कल्याण स्टेशनबाहेर मोबाईल चोरणारा भामटा पोलिसांच्या जाळ्यात कसा सापडला?

Weather Forecast : वर्षाच्या शेवटी सुद्धा पाऊस बरसणार, आयएमडीकडून विदर्भ मराठवाड्याला यलो ॲलर्ट जारी

Chanakya Niti : या 4 स्थितीमध्ये निघून जाणेच फायदेशीर, मान-सन्मान दोघांचेही नुकसान होऊ शकते!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें