AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झटक्यात झाली श्रीमंत… एलन मस्कपेक्षा 1 लाख पट जास्त संपत्ती, जागतिक अर्थव्यवस्थाही फिकी; कसं घडलं?

नॉटिंघममधील सोफी डाऊनिंग एका कॉफी व्हाउचरमुळे जगातील सर्वात श्रीमंत महिला बनली आहे. तिच्या व्हाउचरमध्ये चक्क 63 क्वाड्रिलियन पाउंडची रक्कम दिसली, जी एलन मस्क आणि जागतिक अर्थव्यवस्थेपेक्षाही कितीतरी पटीने अधिक आहे. ही अफाट संपत्ती ती फक्त कॉफी आणि क्रोइसाँट्ससाठीच वापरू शकते, असा अनोखा पेच तिला पडला आहे.

झटक्यात झाली श्रीमंत... एलन मस्कपेक्षा 1 लाख पट जास्त संपत्ती, जागतिक अर्थव्यवस्थाही फिकी; कसं घडलं?
Image Credit source: Getty Images
| Updated on: Feb 21, 2026 | 3:42 PM
Share

देणारा जेव्हा देतो, तेव्हा छप्पर फाडून देतो, अशी मराठीत म्हण आहे. पण एका महिलेच्या बाबतीत छप्पर फाडून मिळालं पण अटीवर मिळालं अशी गोष्ट घडली आहे. नॉटिंघममधील 29 वर्षीय सोफी डाऊनिंग हिच्या बाबतीत एक विलक्षण प्रसंग घडला आहे. ती अचानक जगातील सर्वात श्रीमंत महिला बनली आहे. ध्यानीमनीही नसताना ही गोष्ट घडल्याने ती भारावून गेली आहे. अगदी Elon Musk पेक्षाही लाखो पट अधिक संपत्तीची ती मालकीण झालीय! पण गंमत म्हणजे, ती ही संपत्ती फक्त दोन गोष्टींवरच खर्च करू शकते, ते म्हणजे कॉफी आणि क्रोइसाँट्स.

कशी वाढली संपत्ती?

ख्रिसमसच्या निमित्ताने सोफीला 200 Degrees Coffee या कॅफेकडून 10 पाउंड (सुमारे 1200 रुपये) किमतीचा व्हाउचर मिळाला होता. 12 फेब्रुवारी रोजी तिने तो व्हाउचर वापरला. मात्र बिलावर उरलेला बॅलन्स पाहून ती थक्क झाली. व्हाउचरमध्ये तब्बल 63 क्वाड्रिलियन पाउंड (63 आणि त्यानंतर 15 शून्ये) इतकी रक्कम शिल्लक असल्याचे दिसत होते. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या श्रीमंतीकडे पाहता ही रक्कम Elon Musk यांच्या संपत्तीपेक्षा सुमारे एक लाख पट अधिक आहे. इतकेच नव्हे, तर हा आकडा जागतिक अर्थव्यवस्थेपेक्षा सुमारे 670 पट जास्त असल्याचे सांगितले जाते.

चूक कशी झाली?

सोफीच्या मते, कॅफेमध्ये व्हाउचरचा बारकोड स्कॅन करताना रक्कम व्यवस्थित नोंदवली गेली नसावी. त्यामुळे बारकोडमधील आकडेच शिल्लक रकमेप्रमाणे प्रणालीमध्ये दिसू लागले असावेत. तिने एका वृत्तसंथेशी बोलताना सांगितले की, ही रक्कम पाहून तिला आश्चर्य वाटले आणि थोडेसे हसूही आले. काउंटरवरील कर्मचाऱ्यालाही हा आकडा पाहून धक्का बसला, मात्र त्याने कोणतीही तक्रार केली नाही.

आता दुकानच खरेदी करू शकते

व्हाउचरमधील शिल्लक रक्कम इतकी प्रचंड आहे की, ती संपूर्ण दुकानातील सर्व सामान खरेदी करू शकते. तरीही सोफीने तसे न करण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या मते, तसे केल्यास अनावश्यक अडचणी निर्माण होऊ शकतात. सध्या मात्र ती या ‘अफाट संपत्ती’चा वापर फक्त कॉफी आणि क्रोइसाँट्स खरेदी करण्यापुरताच करत आहे.

Follow Us
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?