AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिंदगीची फिकीर नाही, मृत्यूचं भय नाही… Viral होण्यासाठी घट्ट मिठी मारत जोडप्याची उधाणलेल्या कालव्यात उडी; Video पाहून अंगावर काटा…

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळे नेटकरी भयभीत झाली आहेत. त्यामध्ये फक्त रीलसाठी एक जोडपं एकमेकांना मिठी मारून कालव्याच्या पाण्यात उडी मारतात, पण तो व्हिडीओ पाहून अनेकांच्या काळजाचा ठोकाच चुकला ना भाऊ...

जिंदगीची फिकीर नाही, मृत्यूचं भय नाही... Viral होण्यासाठी घट्ट मिठी मारत जोडप्याची उधाणलेल्या कालव्यात उडी; Video पाहून अंगावर काटा...
रीलसाठी जोडप्याची कालव्यात उडीImage Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Aug 12, 2025 | 3:17 PM
Share

मोबाईल आणि सोशल मीडिया.. प्रत्येकालाच थोड्याफार प्रमाणात या दोन्ही गोष्टी वापररायची सवय असते. पण काहींना त्याचं वेडच लागतं आणि सोशल मीडियावर, इंटरेनटवर व्हायरल होण्यासाठी काही लोकं असं पाऊल उचलतात, की त्यांना त्यांच्या जीवाची देखील पर्वा नसते. आता जरा हाच व्हिडीओ पहा ना. एका जोडप्याने, म्हणजेच कपलने रील बनवण्याच्या नादात चक्क उधाणलेल्या कालव्यात यउडी मारली ना, तेपण कोणत्याही सेफ्टी जॅकेटशिवाय, कोणतीही सुरक्षा नसतानाच ते पाण्यात पडले धाडकन. हा व्हिडीओ आता वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला असून, तुम्ही पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. व्हिडीओमधल्या त्या कपलचं वागणं पाहून कोणीची दचकेल.

इंटरनेटवर वेगाने व्हायरल

सोशल मीडिया आणि इंटरनेटवर वेगाने व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतं की, एक जोडपं कालव्याच्या काठावर उभं आहे. आजूबाजूला खूप लोकही आहेत. तेवढ्यातच ते जोडपं एकमेकांना मिठी मारतात आणि फिल्मी शैलीत कालव्यात उडी मारतात आणि दोघेही पाण्यात पडताच व्हिडिओ तिथेच संपतो.

हा व्हिडिओ नताशा यादव नावाच्या एका युजरने @imnatasha09 या सोशल साइट x हँडलवरून शेअर केला आहे. अतिशय हैराण होऊन तिने तशीच कॅप्शनही लिहीली आहे ना.. ” ना जिंदगीची फिकीर, ना मरणाचं भय… बस Reels बनली पाहिजेत सर..” हा व्हिडिओ आतापर्यंत 4 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर नेटिझन्सनी कमेंट सेक्शनमध्ये विविध कमेंट्स करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हाच तो व्हिडीओ

एका युजरने लिहिले, रीलवाल्या लोकांचा खूप ड्रामा सुरू आहे. तर दुसऱ्याने लिहीलं, हे कधी ना कधी मरतील. आणखी एका युजरनेही हैराण होऊन कमेंट केली आहे ती म्हणजे, चित्रपटांनी लोकांचं डोकंच खराब केलं आहे. दुआजकाल रीलच्या नावाने वेडेपणा जास्त सुरू आहे, असं लिहीत आणखी एका नेटिझननने या व्हिडीओवर संताप व्यक्त केला आहे.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.