फ्लॉवर समझा था फायर निकली ये! मगरीने अशी काही आकाशाच्या दिशेने झेप घेतली
हा व्हिडीओ खूप थरारक आहे. हा व्हिडिओ एका युझरने ट्विटरवर शेअर केला आहे.

जेव्हा जेव्हा मगर आपली शिकार पाहते, तेव्हा ती लगेच हल्ला करते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मगर पाण्यावरून उडणाऱ्या ड्रोनवर झडप घालते. हा व्हिडीओ खूप थरारक आहे. हा व्हिडिओ एका युझरने ट्विटरवर शेअर केला आहे.
एका नदीवर ड्रोनच्या मदतीने काही तज्ज्ञ वन्यजीवांचे व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी नदीमध्ये असलेल्या मगरीला तो ड्रोन दिसला.
मगरीला तो एखादा मासा किंवा पक्षी असल्यासारखं वाटलं. शिकार समजून मगरीने लगेच त्यावर झडप घातली. तिने उडी मारताच ड्रोन वर उचलण्यात आला. पण हा व्हिडीओ कैद झाला.
या मगरीची झेप पाहण्यासारखी होती. जेव्हा तिने उडी मारली तेव्हा असे वाटले की, ती मगर नाही तर नदी किंवा समुद्रात डुबकी मारणारा एक मोठा मासा आहे.
इतकंच नाही तर त्या मगरीचं जवळ जवळ संपूर्ण शरीरच हवेत होतं. ड्रोन मगरीच्या जबड्यात गेलं असतं तर ड्रोन फुटलं असतं, मगरीच्या जबड्यालाही इजा झाली असती.
Impressive pic.twitter.com/AfBG40jXkV
— Tansu YEĞEN (@TansuYegen) November 4, 2022
मगरीचा हा स्टंट बघण्यासारखा होता. हा जबरदस्त व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
