AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar Birthday : शरद पवार आज 85 वर्षांचे झाले, त्यांच्याकडून तुम्ही काय शिकू शकता? कुठला गुण घेतला पाहिजे? जाणून घ्या

Sharad Pawar Birthday : शरद पवार हे महाराष्ट्राच्याच नाही, देशाच्या राजकारणातील एक मोठं नाव आहे. मराठा स्ट्राँग मॅन एवढीच त्यांची ओळख नाही. पंतप्रधान भूषवण्याची क्षमता असलेला हा गुणवान नेता. पण नियतीने त्यांना ही संधी मिळू दिली नाही. म्हणून शरद पवार या नावाभोवतीच वलय अजिबात कमी होत नाही.

Sharad Pawar Birthday : शरद पवार आज 85 वर्षांचे झाले, त्यांच्याकडून तुम्ही काय शिकू शकता? कुठला गुण घेतला पाहिजे? जाणून घ्या
Sharad Pawar Image Credit source: PTI
| Updated on: Dec 12, 2025 | 11:30 AM
Share

आपल्या देशात राजकीय नेते फार कमी लोकांचा आदर्श असतात. त्यामागे कारणं सुद्धा तशीच आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार एक असं नाव आहे, ज्यांच्याबद्दल तरुणाईला आजही कुतूहल आहे. काही तरुण मंडळींसाठी ते आदर्श आहेत. 12 डिसेंबर हा शरद पवारांचा वाढदिवस. आज त्यांनी वयाच्या 85 व्या वर्षात पदार्पण केलं. शरद पवारांना आपला आदर्श मानावा असे अनेक गुण त्यांच्यामध्ये आहेत. आजची तरुण मंडळी छोट्याशा पराभवानंतर डिप्रेशनमध्ये जाते, निराश होते. आयुष्यासमोर हार पत्करतात. त्यांनी शरद पवारांचं उदहारण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. इतक्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत शरद पवार सार्वजनिक मंचावर चिडलेत किंवा मर्यादा सोडून कधी काही बोललेत असं झालं नाही.

शरद पवारांनी आपल्या कर्तुत्वाने आणि वर्तनाने इतर राजकीय नेत्यांसमोर एक चांगलं उदहारण ठेवलं. भले शरद पवारांचं फोडफोडीचं राजकारण आदर्श कसं ठरु शकतं, असा मुद्दा काही लोक उपस्थित करतील. पण राजकारणात सत्ता मिळवणं हे कुठल्याही पक्षाचं किंवा नेत्याचं उद्दिष्टय असतं. त्यानुसार तडजोडीच, फोडाफोडीच राजकारण केलं जातं. शरद पवारांचा एक खास गुण म्हणजे त्यांची न हरण्याची आणि न थकण्याची वृत्ती. शरद पवार कधी हार मानत नाही, दोन वर्षांपूर्वीच एकदम ताजं उदहारण आहे. शरद पवार यांना त्यांच्या घरातूनच धक्का बसला. पुतणे अजित पवार यांनी त्यांनी बनवलेला पक्ष फोडला. आमदाराचं नाही, तर पक्षासह निवडणूक चिन्ह देखील मिळवलं.

दर्शन घेतलं आणि कामाला लागले

पण त्यानंतर पवार तणतण करत बसले नाहीत, माझा पक्ष चोरला म्हणून. ते सरळ दुसऱ्या दिवसापासून कामाला लागले.यशवंतराव चव्हाण हे शरद पवारांचा आदर्श. शरद पवारांना घडवण्याचं श्रेय हे यशवंतराव चव्हाणांना जातं. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर शरद पवारांनी कराडच्या प्रितीसंगमावर जाऊन यशवंतरावांचं दर्शन घेतलं आणि कामाला लागले. त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिजून काढला ते ही वयाच्या 83-84 व्या वर्षी. हार मानली नाही.

तुम जिओ हजारो साल

लोकसभेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बऱ्यापैकी खासदार निवडून आले. पण विधानसभेला अपयश आलं. पण म्हणून हार मानली नाही. ते आजही लोकांमध्ये जातात, फिरतात. हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. त्यांच्यात इतकी सकारात्मक ऊर्जा आहे की, त्यांनी कॅन्सरसारख्या रोगाला हरवलं. दुसऱ्याबाजूला आपला पक्ष चोरला म्हणून ओरड करणारे नेते दिसतात. शरद पवार यांच्याकडून शिकण्यासारखा आजच्या तरुणाईसाठी बऱ्याच गोष्टी आहेत. हॅप्पी बर्थ डे शरद पवार, तुम जिओ हजारो साल.

'कुंभमेळासाठी येणारे साधू संत जंगलात राहणारे असतात ते काय झाडावर...'
'कुंभमेळासाठी येणारे साधू संत जंगलात राहणारे असतात ते काय झाडावर...'.
डोळे फुटले नाही आमचे, वडेट्टीवार सभागृहातच भडकले, नेमकं घडलं काय?
डोळे फुटले नाही आमचे, वडेट्टीवार सभागृहातच भडकले, नेमकं घडलं काय?.
भाजपचे मुनगंटीवार विरोधकांचे 'भाऊ'? सत्तेत असूनही सरकारला घरचा आहेर
भाजपचे मुनगंटीवार विरोधकांचे 'भाऊ'? सत्तेत असूनही सरकारला घरचा आहेर.
कुंभमेळ्याच्या नावाखाली झाडांची कत्तल, रामटेकडीची झाडं तोडून लपवली?
कुंभमेळ्याच्या नावाखाली झाडांची कत्तल, रामटेकडीची झाडं तोडून लपवली?.
काका-पुतण्यानंतर 'पॉवर'फुल्ल बैठक, राष्ट्रवादी पुन्हा एक होणार?
काका-पुतण्यानंतर 'पॉवर'फुल्ल बैठक, राष्ट्रवादी पुन्हा एक होणार?.
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.