AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी संजय दत्तच्या सणसणीत कानाखाली मारली, मग केसाला खेचून… IPS अधिकारी त्याच्यासोबत असं का वागलेला?

Sanjay Dutt 1993 Mumbai Blast Case: 1993 च्या मुंबई ब्लास्ट दरम्यान नक्की काय काय घडलेलं... संजूबाबाचं नाव कसं आलं समोर, IPS अधिकाऱ्याने संजय दत्तच्या सणसणीत कानाखाली मारली, मग केसाला खेचून... अखेर सत्य समोर आलंच...

आधी संजय दत्तच्या सणसणीत कानाखाली मारली, मग केसाला खेचून... IPS अधिकारी त्याच्यासोबत असं का वागलेला?
अभिनेता संजय दत्त
| Updated on: Dec 12, 2025 | 11:18 AM
Share

Sanjay Dutt 1993 Mumbai Blast Case: अभिनेता संजय दत्त याला 1993 मध्ये बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्यामुळे अटक करण्यात आली. त्याच वर्षी मुंबईत ब्लास्ट देखील झालेला आणि प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी IPS अधिकारी राकेश मारिया यांच्यावर होती. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत राकेश मारिया यांनी तेव्हा नक्की काय घडलेलं याबद्दल सांगितलं आहे. संजय दत्त याला विमानतळावर पाहिल्यानंतर राकेश मारिया यांनी संजूबाबाच्या सणसणीत कानाखाली मारली… याबद्दल राकेश मारिया यांनी सविस्तर सांगितलं आहे.

राकेश मारिया यांनी केली अतिशय कडक चौकशी

राकेश मारिया यांनी 1993 मध्ये मुंबईत झालेल्या ब्लॉस्टबद्दल मोठा खुलासा केला आहे… तेव्हा संजय दत्त मॉरिशस येथे सिनेमाची शुटिंग करत होता. भारतात परतल्यानंतर त्याला विमातळावरुव थेट पोलीस स्थानकात आणण्यात आलं… जेथे संजय दत्त याची कसून चौकशी करण्यात आली. तेव्हा संजूबाबाच्या अडचणीत मोठी वाढ झालेली होती…

राकेश मारिया म्हणाले, ‘संजय दत्त याने पहिल्यांदा सांगितलं की, मी कोणताच गुन्हा केलेला नाही… तेव्हा त्याचे केस लांब होते.. मी त्याच्या सणसणीत कानाखाली मारली… त्याने केस ओढून त्याला वर खेचलं… त्यानंतर मला त्याने सर्वकाही सांगितलं… सुनिल दत्त यांना काहीही सांगू नका असं देखील त्याने मला सांगितलं… यावर मी त्याला म्हणालो, ‘तुझ्या वडिलांना मी सांगणार नाही असं होईल का?”

वडिलांसमोर चूक केली मान्य…

राकेश मारिया पुढे म्हणाले, ‘संजय दत्त याला एका खोलीत नेण्यात येतं… जिथे त्याचे वडील (सुनिल दत्त) असतात… तो एका लहान मुलाप्रमाणे ओरडू लागतो आणि जावून वडिलांच्या पायाखाली पडतो आणि म्हणतो, ‘बाबा चुकी झाली…’ पण याप्रकरणी संजय याचं नाव कसं समोर आलं? असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल…

यावर राकेश म्हणाले, वांद्र येथील लोकप्रिय रेस्टॉरंटचे मालक हनीफ कडावाला आणि इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर्स असोसिएशन (IMPA) चे तत्कालीन अध्यक्ष समीर हिंगोरा यांच्या मदतीमुळे संजूबाबाचं नाव समोर आलं.. राकेश म्हणाले, ‘हनीफ आणि समीर मला म्हणाले तुम्ही मोठ्या लोकांना का अटक करत नाही? यावर मी दोघांना म्हणालो, कोणत्या मोठ्या लोकांना मी अटक केली नाही? तेव्हा त्यांनी मला सांगितलं संजय दत्त… मला देखील कळलं नाही, यामध्ये संजय दत्तंचा काय संबंध असेल…’

हनीफ आणि समीर यांनी राकेश यांनी दिलेल्यामाहितीनुसार, कारमधून शस्त्रे काढण्यासाठी हल्लोखोरांना एक जागा हवी होती आणि यासाठी संजय दत्त याच्या घराचा सल्ला देण्यात आलेला… त्याच शस्त्रांचा वापर 1993 मध्ये हल्ला करण्यासाठी करण्यात आलेला… असं देखील राकेश मारिया यांनी सांगितलं… संजय दत्तला बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याबद्दल तुरुंगवासही भोगावा लागला होता. त्याने त्याची शिक्षा भोगली आणि 2016 मध्ये त्याची सुटका झाली. त्यानंतर तो सिनेमांमध्ये पुन्हा सक्रिय झाला.

'कुंभमेळासाठी येणारे साधू संत जंगलात राहणारे असतात ते काय झाडावर...'
'कुंभमेळासाठी येणारे साधू संत जंगलात राहणारे असतात ते काय झाडावर...'.
डोळे फुटले नाही आमचे, वडेट्टीवार सभागृहातच भडकले, नेमकं घडलं काय?
डोळे फुटले नाही आमचे, वडेट्टीवार सभागृहातच भडकले, नेमकं घडलं काय?.
भाजपचे मुनगंटीवार विरोधकांचे 'भाऊ'? सत्तेत असूनही सरकारला घरचा आहेर
भाजपचे मुनगंटीवार विरोधकांचे 'भाऊ'? सत्तेत असूनही सरकारला घरचा आहेर.
कुंभमेळ्याच्या नावाखाली झाडांची कत्तल, रामटेकडीची झाडं तोडून लपवली?
कुंभमेळ्याच्या नावाखाली झाडांची कत्तल, रामटेकडीची झाडं तोडून लपवली?.
काका-पुतण्यानंतर 'पॉवर'फुल्ल बैठक, राष्ट्रवादी पुन्हा एक होणार?
काका-पुतण्यानंतर 'पॉवर'फुल्ल बैठक, राष्ट्रवादी पुन्हा एक होणार?.
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.