Diamond : एका क्षणात मजूराचं आयुष्य बदललं, खोदून काढला 70 लाखांचा दर्जेदार हिरा, झाला लक्षाधीक्ष… आता पुढे काय ?

कृष्ण कल्याणपूर इथल्या हिऱ्याच्या खणादीत त्यांना 11.88 कॅरेटचा हा हिरा (Diamond) सापडला आहे. या हिऱ्याची किंमत अंदाजे 70 लाख असल्याचे सांगण्यात येते आहे. पन्ना जिल्ह्यात जिल्ह्याच्या शहरापासून 30 किमी अंतरावर असलेल्या गावात प्रताप सिंह (Pratap Singh) राहतात.

Diamond : एका क्षणात मजूराचं आयुष्य बदललं, खोदून काढला 70 लाखांचा दर्जेदार हिरा, झाला लक्षाधीक्ष... आता पुढे काय ?
एका क्षणात मजूराचं आयुष्य बदललं, खोदून काढला ७० लाखांचा दर्जेदार हिरा, झाला लक्षाधीक्ष...
Image Credit source: tv9
दादासाहेब कारंडे

|

May 04, 2022 | 8:06 PM

पन्ना – हिरा नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पन्ना जिल्ह्यात एका क्षणात मजुराचं (Worker) आयुष्य बदललं आहे. झरकुवा गावातील रहिवासी असलेल्या प्रताप सिंह यादव यांना बुधवारी खदाणीत महागडा असलेला उज्ज्वल असा हिरा सापडला आहे. कृष्ण कल्याणपूर इथल्या हिऱ्याच्या खणादीत त्यांना 11.88 कॅरेटचा हा हिरा (Diamond) सापडला आहे. या हिऱ्याची किंमत अंदाजे 70 लाख असल्याचे सांगण्यात येते आहे. पन्ना जिल्ह्यात जिल्ह्याच्या शहरापासून 30 किमी अंतरावर असलेल्या गावात प्रताप सिंह (Pratap Singh) राहतात. शेती आणि मजुरीचे काम करुन ते आपल्या कुटुंबाची गुजराण करत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी या खदानीत खोदकामाची अधिकृत परवानगी घेतली. उन्हाच्या झळांमध्ये काम करत त्यांनी या हिऱ्याचा शोध घेतला आहे. त्यानंतर हा हिरा त्यांनी कार्यालयात जमा केला आहे. आता या मजुराला या हिऱ्यातून किती उत्पन्न मिळणार हे पाहूयात.

हिऱ्याला किती भाव

हिऱ्यांच्या तीन प्रकारांपैकी या उज्ज्वल म्हणजेच जेम प्रकाराच्या हिऱ्याला सर्वाधिक भाव मिळतो. हा स्फटिकासारखा पांढराशुभ्र असतो. सूरतच्या सराफा बाजारात साधारणपणे एक कॅरेट हिऱ्याची किंमत ८ लाखांच्या घरात असते. हा हिरा शुद्ध स्वरुपाचा असतो. पन्ना जिल्ह्यात या बोलीचा दर सरासरी ४ लाखांच्या घरात असतो.

प्रतापसिंह यांना साधारण ५० लाख मिळणार

मजूर असलेल्या प्रतापसिंह यांना मिळालेला हिरा हा उज्ज्वल स्वरुपाचा आहे. आता हा पुढच्या लिलावात ठेवण्यात येईल. यातून मिळणारी रक्कमेतील १२ टक्के सरकारी रॉयल्टी आणि १ टक्का कर सोडल्यास इतर रक्कम प्रतापसिंह यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. ६० ते ७० लाखांत या हिऱ्याचा लिलाव होईल आणि ५० लाखांपर्यंतची रक्कम प्रतापसिंह यांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

मुलांना चांगल्या शाळेत शिकवण्याचं स्वप्न

हा हिरा सापडल्याने आयुष्य सुखकर होईल, अशी आशा प्रतापसिंह यांना आहे. आता कुटुंबाची आर्थिक स्थिती जरा चांगली होईल, याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. आता यातून काहीतरी उद्योग करु आणि मुलाबाळांना चांगल्या शआळेत पाठवू, असा आशावादी सूर प्रतापसिंह यांनी व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें