AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंग्रजी वर्णमालेतील 27 वे अक्षर मिळाले! Z नंतर येणारे हे अक्षर अनेकांना माहीतच नाही…कसा होत होता त्या अक्षराचा वापर

Z नंतर अँड (and) बोलल्यामुळे वर्णमालेत पुढे अजून काही असले, असे वाटत होते. यामुळे ‘per se &’ याला अँड बोलले जाऊ लागले. त्याचा उच्चार ‘ampersand’ (अँपरसँड) होऊ लागली. लॅटीन भाषेत per se चा अर्थ सर्वात वेगळा आहे.

इंग्रजी वर्णमालेतील 27 वे अक्षर मिळाले! Z नंतर येणारे हे अक्षर अनेकांना माहीतच नाही...कसा होत होता त्या अक्षराचा वापर
| Updated on: Jul 11, 2024 | 1:54 PM
Share

लहाणपणात आपण सर्वांनी A,B,C,D…ही वर्णमाला पाठ केली आहे. त्यावेळी इंग्रजी वर्णमालेत 26 अक्षरेच असल्याचे आपणास शिकवले गेले आहे. त्यामुळे इंग्रजी वर्णमालेत 26 अक्षरे आहेत? हेच आपणास माहीत आहे. परंतु इंग्रजी वर्णमालेत 26 नाही तर 27 अक्षर होती. हे 27 अक्षर Z नंतर येते. मग हे अक्षर कुठे गेले? त्या अक्षरास काय म्हणतात. त्यासंदर्भातील माहिती जाणून घेऊ या.

कोणते आहे ते अक्षर

डेली स्टार न्यूज वेबसाइटमधील रिपोर्टनुसार, @zachdfilms3 या टिकटॉक यूजरने एका व्हिडिओ पोस्ट केला. त्या व्हिडिओमधून इंग्रजीतील 27 अक्षर सांगितले आहे. इंग्रजीत असणारे अँपरसँड (&) (ampersand) हा इंग्रजीतील वर्णमालेतील 27 वे अक्षर आहे. अनेक वर्षांपूर्वी हे अक्षर अभ्यासातही होते. ब्रिटॅनिका वेबसाइटनुसार, इंग्रजीतील 27 वे अक्षर & होते. हे अक्षर 1835 मध्ये इंग्रजीत आले. ते इतर अक्षराप्रमाणे वापरले जात होते. 19 व्या शतकात इंग्लंडमधील विद्यार्थ्यांना हे अक्षर शिकवले जात होते. हा शब्द लॅटीन भाषेतील ‘et’ शब्दापासून बनला. त्याचा अर्थ ‘एंड’ आहे. त्यावेळी विद्यार्थी वर्णमाला शिकताना Q R S T U V W X Y Z & वाचत होते.

मग Z नंतर अँड (and) बोलल्यामुळे वर्णमालेत पुढे अजून काही असले, असे वाटत होते. यामुळे ‘per se &’ याला अँड बोलले जाऊ लागले. त्याचा उच्चार ‘ampersand’ (अँपरसँड) होऊ लागली. लॅटीन भाषेत per se चा अर्थ सर्वात वेगळा आहे.

कंपन्यांच्या नावात होऊ लागला वापर

19व्या शतकाच्या अखेरीपर्यंत अँपरसँडला फक्त एक सिंबल मानले गेले. त्यामुळे अँपरसँडला वर्णमालापासून वेगळे केले गेले. L&T, Marks & Spencer’, ‘Procter & Gamble’, H&M, इत्यादी कंपन्यांच्या नावानेही दिसू लागले. कॅम्पुटरमधील प्रोग्रामिंगमध्येही त्याचा वापर केला जात आहे. परंतु इंग्रजी वर्णमालेत आता शिकवण्यासाठी 27 ऐवजी 26 अक्षरेच असल्याचे शिकवले जाते. अनेक लोकांना 27 अक्षर माहीतच नाही.

कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?.
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा
महायुतीत तिढा कायम,सामंत मध्यस्थीसाठी पुण्यात;शिवसेनेचा स्वबळाचा इशारा.
दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 100 टक्के... राऊतांचं मोठं वक्तव्य
दोन भावांची युती अन् मनोमिलन झालंय, 100 टक्के... राऊतांचं मोठं वक्तव्य.
सिंदखेडराजा नगरपरिषदेत 21वर्षीय सौरभ तायडे विजयी, कमी वयाचा नगराध्यक्ष
सिंदखेडराजा नगरपरिषदेत 21वर्षीय सौरभ तायडे विजयी, कमी वयाचा नगराध्यक्ष.
मशालीला आईस्क्रीम कोनासारखं फेकलं...भाजपची टीका, राऊतांचं उत्तर काय?
मशालीला आईस्क्रीम कोनासारखं फेकलं...भाजपची टीका, राऊतांचं उत्तर काय?.
कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ...
कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ....
हे विजयी कसे झाले? महायुतीच्या विजयानंतर 'समाना'तून जोरदार टीकास्त्र
हे विजयी कसे झाले? महायुतीच्या विजयानंतर 'समाना'तून जोरदार टीकास्त्र.
...म्हणून गप्प होतो, पण आता ती वेळ आलीये, नितेश राणेंचा रोख कुणाकडे?
...म्हणून गप्प होतो, पण आता ती वेळ आलीये, नितेश राणेंचा रोख कुणाकडे?.
जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका... राज ठाकरे यांच्याकडून सूचना
जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका... राज ठाकरे यांच्याकडून सूचना.