VIDEO | तुम्हाला बटाटा चिप्स आवडतात का?, फॅक्टरीमध्ये या स्वादिष्ट बटाटा चिप्स कशा बनवल्या जातात व्हिडीओत पाहा
सध्या एका कंपनीतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये खराब बटाटे स्वच्छ केले जात आहेत. हा व्हिडीओ लोकांना अधिक आवडला आहे.

मुंबई : चटपटीत पदार्थ बनवणाऱ्या कंपन्यामध्ये पदार्थ कशा पद्धतीने तयार केले जातात, लोकांना हे पाहायला अधिक आवडतं. अनेक छोट्या कंपनीतील व्हिडीओ (Chips Video) सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तुम्हाला बटाटा चिप्स (potato chips) कसे तयार करतात माहित आहे का?. सध्या बटाटा चिप्स मशीनद्वारे कशा तयार केल्या जातात त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अनेकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओला (viral video) अनेकांनी चांगल्या आणि वाईट कमेंट केल्या आहेत.
काही छोट्या कंपन्यातील कारखान्यात सुरुवातील खराब झालेले बटाटे दिसत आहेत. ते कशा पद्धतीने साफ करीत आहेत हे व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर त्या व्हिडीओमध्ये बटाट्याच्या साली काढल्या जात आहेत. काहीवेळाने बटाट्याचे बारीक बारीक तुकडे केले जात आहे. त्यानंतर त्या बटाट्यावरती मसाला टाकला जात आहे आणि नंतर एका मशीनखाली ठेवलं जात आहे.
कापलेला बटाटा ज्यावेळी तळला जात आहे. त्यावेळी त्यांचं चिप्स तयार होत आहे. ते चिप्स कन्वेयर बेल्टवरती ठेवले जातात. काहीवेळाने पॅकिंगसाठी पाठवले जात आहेत. शेवटी, पॅक केलेले चिप्स एका कंटेनर सारख्या बॉक्समध्ये भरले जात आहेत.
काही कंपन्या चिप्सच्या बॅगमध्ये हवा जास्त भरतात आणि पदार्थ कमी असतो. त्यामुळे ग्राहक सुध्दा अशा कंपन्यांचे पदार्थ खरेदी करीत नाही. एका इन्स्टाग्राम युझरने लिहीलं आहे की, भाई इतके सगळे चिप्स असताना सुध्दा तुम्ही एका पॉकेटमध्ये चार चिप्स असतात.
View this post on Instagram
अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेचं व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर असे व्हिडीओ लोकांना पाहायला सुध्दा अधिक आवडतात. सध्याचा व्हिडीओ अनेक लोकांनी पाहिला आहे, त्याचबरोबर या व्हिडीओला कमेंट सुध्दा अधिक आल्या आहेत.
