VIDEO | मालक रुग्णवाहिकेत, इमानदार कुत्रा मागोमाग धावत थेट रुग्णालयात

पाळीव कुत्रे त्यांच्या मालकावर इतकं प्रेम करतात की कधीकधी ते त्यांच्यासाठी स्वत:चा जीवदेखील धोक्यात घालायला मागेपुढे बघत नाहीत. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

VIDEO | मालक रुग्णवाहिकेत, इमानदार कुत्रा मागोमाग धावत थेट रुग्णालयात
मालकाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा पाळी कुत्र्याकडून पाठलाग
| Edited By: | Updated on: Jun 11, 2021 | 3:44 PM

मुंबई : प्रत्येकाला माहित आहे की, कुत्रा हा एक अतिशय निष्ठावंत प्राणी आहे. पाळीव कुत्रे त्यांच्या मालकावर इतकं प्रेम करतात की कधीकधी ते त्यांच्यासाठी स्वत:चा जीवदेखील धोक्यात घालायला मागेपुढे बघत नाहीत. सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय, ज्या व्हिडीओमध्ये एक पाळीव कुत्रा आणि त्याचा मालक यांच्यातील घट्ट नातं पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक कुत्रा एका रुग्णवाहिकेच्या मागे धावतोय. या रुग्णवाहिकेमधून त्याच्या मालकाला घेऊन जात आहेत, त्यामुळे तो कुत्रा रुग्णवाहिकेमागे सैरावैरा पळत सुटलाय. या निष्ठावान कुत्र्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Dog chasing Ambulance carrying his owner who is ill, Istanbul viral video)

इस्तंबूलमधील हा एक भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कुत्रा आणि मालकामध्ये असलेले प्रेम आणि बॉन्डिंग या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. ज्यात एक कुत्रा रुग्णवाहिकेच्या मागे पळत आहे, कारण त्याच्या मालकास रुग्णालयात घेऊन जात आहेत. रुग्णवाहिकेच्या मागे पळत असलेल्या कुत्र्याचा हा व्हिडिओ लाखो लोकांची मनं जिंकत आहे. हा कुत्रा त्या रूग्णवाहिकेचा पाठलाग करत रुग्णालयातदेखील पोहोचला.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ वृत्तसंस्था रॉयटर्सने (Reuters) आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. रॉयटर्सच्या ट्विटनुसार, रुग्णवाहिका कुत्र्याच्या आजारी मालकास घेऊन जात होती आणि तो रुग्णवाहिकेच्या मागे पळायला लागला. कुत्र्याचं त्याच्या मालकावर असलेल्या प्रेमाबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे.

इतर बातम्या

Video | दहा फुटाचा साप चढला विजेच्या खांबावर, शॉक लागल्यामुळे घडला मोठा अपघात, व्हिडीओ व्हायरल

Video | पाणी पिण्यासाठी जीव व्याकूळ, तहानलेल्या हत्तीचा संयम एकदा पहाच !

Video | चेहरा झाककेली महिला, एक हात मागे; समोरच्या हतबल तरुणाचं नेमकं काय होणार ?, पाहा संपूर्ण व्हिडीओ

(Dog chasing Ambulance carrying his owner who is ill, Istanbul viral video)