AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कधी वाटलं होतं का कुत्रा इतका स्टाईल मध्ये चालू शकतो ?

कुत्र्यांना जे काही शिकवलं जातं, ते पटकन शिकतात हे तुम्ही पाहिलं असेलच. अशाच एका कुत्र्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो इतक्या चांगल्या पद्धतीने कॅटवॉक करायला शिकला आहे की जे पाहून मॉडेल्सनाही लाज वाटेल.

कधी वाटलं होतं का कुत्रा इतका स्टाईल मध्ये चालू शकतो ?
Dog lover catwalkImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 06, 2023 | 7:36 PM
Share

मुंबई: कुत्र्यांची गणना जगातील सर्वात सुंदर आणि निष्ठावान प्राण्यांमध्ये केली जाते, जे आपल्या मालकांसाठी काहीही करण्यास तयार असतात. गरज पडल्यास ते आपल्या प्राणांची आहुतीही देतात. जगात असे लाखो लोक आहेत ज्यांना कुत्रे पाळणे आवडते. लोकांना फक्त कुत्रा वाढवणंच नाही तर त्यांच्यासोबत खेळणंही आवडतं. कुत्र्यांना जे काही शिकवलं जातं, ते पटकन शिकतात हे तुम्ही पाहिलं असेलच. अशाच एका कुत्र्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो इतक्या चांगल्या पद्धतीने कॅटवॉक करायला शिकला आहे की जे पाहून मॉडेल्सनाही लाज वाटेल.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कुत्र्याच्या गळ्याभोवती मफलर गुंडाळलेला आहे आणि त्याच्या डोळ्यावर चष्माही आहे. हे कुत्रं मॉडेल आहे असं दिसतंय. यानंतर एखादी मॉडेल कॅटवॉक करत असल्यासारखे हा कुत्रा चालायला लागतो. आता असे दृश्य पाहून जर कोणी हसणार नाही तर काय होणार? कुत्र्यांची गणना केवळ बुद्धिमान प्राण्यांमध्ये होत नाही, तर त्यांची बुद्धिमत्ता लोकांना विचार करण्यास भाग पाडते. कुत्र्याला अशा प्रकारे कॅटवॉक करताना तुम्ही क्वचितच पाहिलं असेल. हा व्हिडिओ खूपच मजेशीर आहे, जो लोकांनाही खूप आवडत आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर adore_pankaj नावाच्या आयडीसह हा मजेशीर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 4.8 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे, तर 48 लाख 3 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाइक देखील केला आहे.

त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. कुणी म्हणतंय की हा कुत्रा खरंच रिअल कॅटवॉक मॉडेलसारखा दिसतो, तर दुसऱ्या युजरने लिहिलं की ‘मला खात्री आहे की हा कुत्रा मॉडेलिंग स्कूलमध्ये गेला होता, कारण त्याचं चालणं परफेक्ट आहे!’.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच