AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वृद्ध व्यक्तीला स्कुटीने फरफटत, ओढत नेलं, व्हिडीओ बघून लोक म्हणाले,”माणुसकी मरत आहे”

या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ ANI या वृत्तसंस्थेने ट्विटरवर पोस्ट केला असून बेंगळुरूच्या मगदी रोडवर एका वृद्ध व्यक्तीला स्कूटरच्या मागे फरफटत नेल्याची माहिती समोर आली आहे.

वृद्ध व्यक्तीला स्कुटीने फरफटत, ओढत नेलं, व्हिडीओ बघून लोक म्हणाले,माणुसकी मरत आहे
Elder man dragged by scootyImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 17, 2023 | 7:46 PM
Share

बेंगळुरूमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर वेगाने शेअर केला जात आहे. यामध्ये एक वृद्ध व्यक्ती स्कूटीवरून रस्त्यावर फरफटत जाताना दिसत आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ ANI या वृत्तसंस्थेने ट्विटरवर पोस्ट केला असून बेंगळुरूच्या मगदी रोडवर एका वृद्ध व्यक्तीला स्कूटरच्या मागे फरफटत नेल्याची माहिती समोर आली आहे. या व्यक्तीवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दुचाकी चालकाला पीएस गोविंदराज नगर येथून अटक केली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्कूटी चालवताना दिसत आहे. एवढं सगळं होत असताना हा माणूस गाडी थांबवण्याऐवजी गाडी पळवत आहे. त्यानंतर काही पादचाऱ्यांनी स्कूटीचालकाला अडवून वृद्धाचा जीव वाचवला.

असा दावा केला जात आहे की, स्कूटी स्वाराने वृद्धाच्या कारला धडक दिली, त्यानंतर त्याने त्या व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तो पळून जाऊ लागला. अशा तऱ्हेने त्या म्हाताऱ्याने पाठीमागून या व्यक्तीची स्कूटी पकडली. जेणेकरून तो पळून जाऊ शकणार नाही.

पण त्या व्यक्तीने स्कूटी पळवली आणि वृद्ध व्यक्तीला आपल्या गाडीमागे ‘एक किलोमीटर’ खेचत नेले. आता या व्हिडीओमुळे लोक संतप्त झाले आहेत. एका युजरने लिहिलं- “माणुसकी नाही, एका वृद्ध व्यक्तीला कसं ओढलं जातंय, पाहिलंही नाही!”

आणखी एक जण म्हणाला- या व्यक्तीवर कडक कारवाई झाली पाहिजे. त्याचप्रमाणे अनेक युजर्स स्कूटी रायडरवर टीका करत आहेत. त्याचबरोबर त्याला कडक शिक्षा व्हावी, अशी मागणीही केली जात आहे.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.