Video: हत्ती आणि मगरीची लढाई, पाहा कोण पडले कुणावर भारी, अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ!

दोन महाकाय प्राण्यांमधील ही लढाई एका पर्यटकाने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केली. चला तर मग जाणून घेऊ या युद्धाचा परिणाम काय झाला आणि कोण कोणावर भारी पडले?

Video: हत्ती आणि मगरीची लढाई, पाहा कोण पडले कुणावर भारी, अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ!
हत्ती आणि मगरीची लढाई


मादी हत्ती आणि मगर यांच्यातील लढ्याचा एक व्हिडिओ आफ्रिकन देश झांबियामधून समोर आला आहे. हत्ती तिच्या पिल्लाला मगरीच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी यात लढताना दिसतो आहे. दोन महाकाय प्राण्यांमधील ही लढाई एका पर्यटकाने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केली. चला तर मग जाणून घेऊ या युद्धाचा परिणाम काय झाला आणि कोण कोणावर भारी पडले? (Elephant and crocodile battle in Zambia, elephant kills crocodile.)

‘डेली मेल’च्या अहवालानुसार, आफ्रिकन हत्तींचा कळप झांबेझी नदीच्या काठावर पाणी पिण्यासाठी आला तेव्हा ही घटना घडली. यादरम्यान एका मगरीने हत्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे पाहून हत्तीने मगरीवर हल्ला केला.

हत्तीने पाण्यातच मगरीला तुडवायला सुरुवात केली. त्याने आपल्या सोंडेने मगरीवर अनेक वार केले. या दरम्यान, मगरीने हत्तीच्या तावडीतून बाहेर पडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण त्यातील एकही प्रयत्न यशस्वी झाला नाही.

पाहा व्हिडीओ:

काही वेळाने हत्ती मगरीला ओढले आणि पाण्याबाहेर आणतो. मगरीने तोपर्यंत आपली हालचाल थांबवली होती. असे मानले जाते की एकतर त्याचा मृत्यू झाला होता, किंवा ती मगर गंभीर जखमी झाली होती. एकूणच या युद्धात हत्तीचे पारडं जड होतं.

या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण हंस हेनरिक हाहर या पर्यटकाने केले आहे. हेनरिक डेन्मार्कचा आहे. व्हिडिओमध्ये 7-8 फूट लांब मगर आणि हत्ती कसे लढत आहेत हे पाहिले जाऊ शकते.

हेही पाहा:

Video: चक्क चाकूने साप कापला आणि पाहतो तर काय..? नेटकऱ्यांकडून साप कापणाऱ्याचं कौतुक

Video: पगडी खोलली, पाण्यात फेकली, दोघांना वाचवलं, शिख तरुणांचा चित्तथरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI