Video: चक्क चाकूने साप कापला आणि पाहतो तर काय..? नेटकऱ्यांकडून साप कापणाऱ्याचं कौतुक

असाच आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक माणूस टेबलावर ठेवलेला 'साप' चाकूने कापून वेगळा करतो.

Video: चक्क चाकूने साप कापला आणि पाहतो तर काय..? नेटकऱ्यांकडून साप कापणाऱ्याचं कौतुक
व्हिडीओमध्ये सापाला कापलं जात आहे

कधीकधी असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे लोकांना आश्चर्यचकित करतात. असाच आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक माणूस टेबलावर ठेवलेला ‘साप’ चाकूने कापून वेगळा करतो. खरं म्हणजे हा साप नसून केक आहे, जो सापाच्या आकारात बनवला होता. पण पहिल्यांदा कुणीही सांगू शकत नाही की हा साप आहे की केक आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ लोकांना आवडत आहे. (realistic snake cake viral video goes viral on social media)

हा व्हिडिओ 11 ऑक्टोबर रोजी इन्स्टाग्रामवर idessideserfcakes नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘आमच्या मित्रांसाठी हा खऱ्या सापाचा केक’. केक पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाने सापाच्या आकारात बनलेला आहे. केक इतक्या सुबकपणे बनवला आहे की पहिल्यांदा कुणी ओळखूच शकत नाही.

पाहा व्हिडीओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Sideserf Cake Studio (@sideserfcakes)

व्हिडिओमधील व्यक्ती चाकूने केक कापते, त्यानंतर युजर्सना समजते की, ते आतापर्यंत ज्याला साप समजले गेले तो प्रत्यक्षात केक आहे. साइडसर्फ केक स्टुडिओच्या नावाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या अकाऊंटला सुमारे सात लाख फॉलोअर्स आहेत. विविध प्रकारच्या खऱ्याखुऱ्या केक्सचे व्हिडिओ या पेजवर शेअर केलेले आहेत. सापाच्या केकचा व्हिडिओ 1 लाख 10 हजारांहून अधिक लोकांना आवडला आहे, तर 1300 हून अधिक लोकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहे.

एका युजरने कमेंट केली आहे की, ‘मी खूप घाबरलो होतो’. त्याचवेळी, दुसऱ्याने केक बनवणाऱ्याचे कौतुक केले आणि म्हणाले, ‘तुमची कला खूप सुंदर आहे.’ याशिवाय अनेकांनी इमोजीजद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या.

हेही पाहा:

Video: पगडी खोलली, पाण्यात फेकली, दोघांना वाचवलं, शिख तरुणांचा चित्तथरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video: ज्या वयात हातात काठी येते, त्या वयात विमान चालवलं, 84 वर्षांच्या आजीबाईंची गगनभरारी!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI