भावा कडक! नागपूरचा चहावाला जॉनी डेप सोशल मीडियावर चमकला

भावा कडक! नागपूरचा चहावाला जॉनी डेप सोशल मीडियावर चमकला

जॉनी डेप हा गेल्या दहा वर्षांपासून नागपूरमध्ये चहाविक्रीचं काम करतोय (Famous tea stall owner Johnny depp in nagpur)

चेतन पाटील

|

Jan 23, 2021 | 11:08 PM

नागपूर : सोशल मीडियावर कोण कधी प्रसिद्ध होईल याचा नेम नाही. सोशल मीडियामुळे कित्येक लोक रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आल्याचे अनेक उदाहरणं आपण बघितली आहेत. तशीच काहीशी गोष्ट नागपूरच्या एका चहावाल्यासोबत घडली आहे. या चहा विक्रेत्याचं नाव जॉनी डेप असं आहे. त्याचा चहा बनवत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर एकाने शेअर केला. त्यानंतर नागपुरात प्रसिद्ध असलेला चहावाल्याची हवा सोशल मीडियावरही बघायला मिळाली (Famous tea stall owner Johnny depp in nagpur).

जॉनी डेप हा गेल्या दहा वर्षांपासून नागपूरमध्ये चहाविक्रीचं काम करतोय. त्याची सर्वात खास आणि विशेष अशी गोष्ट म्हणजे तो त्याच्या ग्राहकांचं एका वेगळ्या अंदाजात मनोरंजन करतो. त्याची ड्रेसिंग स्टाईल बघून तो चहावाला आहे, याच्यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. तो अभिनेता रजनिकांत यांच्या स्टाईलमध्ये ग्राहकांना सिग्रेट पेटवून देतो (Famous tea stall owner Johnny depp in Nagpur).

जॉनीची कामाची स्टाईलच वेगळी आहे. तो दुधाची पिशवी फाडून पातेल्यात दूथ देखील एका वेगळ्या स्टाईलने टाकतो. त्यानंतर तो ग्लासमध्ये चहा देखील हटके अंदाजात भरतो. ग्राहकांचं मनोरंजन व्हावं किंवा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तो ही पद्धत अवलंबतो. मात्र, त्याची ही स्टाईल त्याच्या ग्राहकांनाही आवडते. त्यामुळे जॉनी डेप नागपुरात चांगलाच फेमस झालाय.

जॉनीने दुकानाला आपल्या प्रेयसीचं नाव दिलं आहे. तो सात रुपये ग्लास असा चहा विकतो. लोक त्याच्या चहासोबत त्याच्या गोष्टी ऐकण्यासाठी स्टॉलवर येतात. त्याचं दुकान संपूर्ण शहरात प्रसिद्ध आहे. त्याच्या चहाच्या स्टॉलच्या बाजूला चष्म्यांचं दुकान आहे. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे ग्लास विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. तिथे कबीर सिंग पासून अनेक चित्रपटांचे गॉगल मिळतात. तो लोकांना चष्माबाबतही सजेशन देतो.

Hmm नावाच्या फेसबुक पेजवर जॉनीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत जॉनी स्वत: आपली कहाणी सांगत आहे. या व्हिडीओला हजारो युजर्सने बघितलं आहे. तर काही लोकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा : इमानदार ! मालक हॉस्पिटलमध्ये, दोस्तानं गेटवर ठाण मांडलं !

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें