दोन वाघ समोरासमोर भिडले, एकाने दुसऱ्याला लोळवलं, व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दोन वाघ एकमेकांना भिडताना दिसत आहेत (Fight between two tigers).

दोन वाघ समोरासमोर भिडले, एकाने दुसऱ्याला लोळवलं, व्हिडीओ व्हायरल
| Updated on: Jan 20, 2021 | 4:45 PM

मुंबई : डोळ्यांसमोर चुकूनही वाघ दिसला किंवा त्याच्या डरकाळीचा आवाज कानावर पडला तरी छातीत धडकी भरते. त्यामुळे कित्येक डॅशिंग व्यक्तीमत्वाची तुलना थेट वाघाशी केली जाते. तरीही जंगलातला वाघ हा खरा ओरिजनल वाघ असतो. अशाच दोन ओरिजनल वाघांच्या लढाईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे (Fight between two tigers).

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दोन वाघ एकमेकांना भिडताना दिसत आहेत. पहिला वाघ दुसऱ्या वाघावर आक्रमण करतो, तर दुसरा वाघही मागे हटत नाही. दोघांमध्ये झटापट होते. त्यानंतर एक वाघ जमिनीवर पडतो. वाघांच्या या कुस्तीचा व्हिडीओ 1.18 मिनिटाचा आहे. मात्र, हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे (Fight between two tigers).

व्हिडीओत दोन वाघ सुरुवातीला शांततेत चालत आहेत. त्यानंतर अचानक एक वाघ दुसऱ्या वाघाच्या अंगावर येतो. दुसरा वाघ देखील पहिल्या वाघाला तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. दोघांमध्ये मोठी झटापट होते. या झटापटीत एक वाघ जमिनीवर पडतो. त्यानंतर पहिला वाघ मागे हटतो. त्यानंतर ते वाघ पुन्हा आपापल्या मार्गाला लागतात.

इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ऑफिसर प्रवीण कासवान यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. “वाघांची लढाई, फक्त भारतातून”, असं प्रवीण यांनी व्हिडीओसोबत म्हटलं आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ आपल्याला व्हाट्सअॅपवर मिळाल्याचीदेखील माहिती त्यांनी दिली आहे.

प्रवीण यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करताच अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका युजरने म्हटलं, “दोन वाघांच्या लढाईचा व्हिडीओ खरंच अद्भूत आहे”. तर “ज्या लोकांनी हा व्हिडीओ बघितला ते खूप भाग्यशाली आहेत”, अशी प्रतिक्रिया दुसऱ्या एका युजरने दिली.

हेही वाचा : खुर्ची सोडण्यापूर्वी ट्रम्प यांचा जो बायडन यांना झटका, सरकारी विमान प्रवास नाकारला