ट्रान्सजेंडर जोडपं म्हणतंय, ‘भारतातील पहिल्या ट्रान्समॅनला गर्भधारणा, लवकरच मुल होणार’

Jaywant Patil, Web Editor, Tv9 Marathi

|

Updated on: Feb 04, 2023 | 12:51 PM

लिंग परिवर्तन केल्यानंतर आता मार्चमध्ये ते एका बाळाला जन्म देतील असा दावा त्यांनी केला आहे.याविषयीचे फोटो त्यांनी इन्स्टाग्रामला शेअर केले आहेत. नक्की काय आहे हे.

ट्रान्सजेंडर जोडपं म्हणतंय, 'भारतातील पहिल्या ट्रान्समॅनला गर्भधारणा, लवकरच मुल होणार'

मुंबई : झिया आणि जहाद हे ट्रान्सजेंडर जोडपं आहे. म्हणजे ज्यांनी ऑपरेशन करुन आपलं लिंग परिवर्तन केलं आहे. झिया हा पुरुष म्हणून जन्माला आला होता, तो आता सर्जरी करुन स्त्री झाला आहे. तर स्त्री म्हणून जन्माला आलेली जहाद आता पुरुष झाली आहे. हे ट्रान्सजेंडर जोडपं मागील ३ वर्षापासून एकत्र राहत आहेत, लिंग परिवर्तन केल्यानंतर आता मार्चमध्ये ते एका बाळाला जन्म देतील असा दावा त्यांनी केला आहे.याविषयीचे फोटो त्यांनी इन्स्टाग्रामला शेअर केले आहेत. यात जहाद स्त्रीची पुरुष झाली आहे, ती आता पुरुष दिसत असली तरी ती गर्भवती आहे, असं फोटोत दिसतंय.

आता मार्चमध्ये त्यांच्या बाळाचा जन्म होईल, अशी अपेक्षा ते करत आहेत. भारतात ट्रान्समॅनने गर्भधारणा केल्याची पहिलीच घटना असल्याचा हा दावा केला जात आहे. जहादने एका इन्स्टाग्राम पोस्टवर गर्भधारणेचे फोटो पोस्ट करुन गरोदर असल्याचा दावा केला आहे.

हे कसं शक्य झालं?

जहाद ही जेव्हा स्त्रीची पुरुष झाला, तेव्हाच तिचे स्तन काढून टाकण्यात आले होते.पण तिच्या शरीरात गर्भपिशवी कायम आहे.तसेच लिंग परिवर्तन करण्यापूर्वी जहादने गर्भधारणा केली होती, त्यामुळे हे शक्य झाल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

झिया आणि जहाद यांचे हे बाळ जन्माला येण्यापूर्वी आणि नंतरही अनेक प्रश्न विचारले जाणार आहेत. या बाळाचा जन्म सिझरियन शस्त्रक्रियेने होईल की नैसर्गिक, अर्थातच आता नैसर्गिक येथे फक्त गर्भधारणा हाच विषय राहिला आहे, तेव्हा बाळाचा जन्म नैसर्गिक न होता, सिझरियन शस्त्रक्रियेनेच होईल हीच आता एक शक्यता आहे.

View this post on Instagram

A post shared by Ziya Paval (@paval19)

जहादचे स्तन हे ट्रान्सजेंडर करताना, म्हणजे स्त्रीमधून पुरुष होताना काढून टाकण्यात आले आहेत, तेव्हा जन्मानंतर जेव्हा बाळाला आईचं दूध लागतं, तेव्हा आणखी एक प्रश्न उभा राहणार आहे. पण मदर मिल्क बँकमधून ही गरज पूर्ण करता येऊ शकते. यासारखे अनेक प्रश्न असतील. भारतात ट्रान्समॅनने बाळाला जन्म देण्याची घटना असं म्हटलं जात असलं, तरी नैसर्गिक येथे फार कमी आहे.

कारण ही गर्भधारणा महिलेचा पुरुष होण्याआधी झालेली गर्भधारणा आहे. आता या ट्रान्सजेंडरने पुन्हा ठरवलं की, बाळ जन्माला घालायचं आहे, तर ते शक्य होणार नाही. कारण आता फक्त ते लिंगाने बदललेले आहेत, पण गर्भधारणा करण्यासाठी असलेले अवयव त्यांच्याकडे असूनही, लिंग बदलामुळे ते आता काम करु शकणार नाहीत. हे नक्की.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI