भारतातील असं एक गाव, जिथे प्रेग्नंट होण्यासाठी येतात विदेशातून तरुणी; कारण ऐकून हैराण व्हाल
विदेशातून तरुणी भारतात फक्त प्रेग्नेंट होण्यासाठी येतात, 'त्या' गावात नक्की असं आहे तरी काय ज्यामुळे तरुणी घेतात इतका मोठा निर्णय... कारण ऐकून हैराण व्हाल

आई होणं प्रत्येक महिलेसाठी अत्यंत खास क्षण असतो. पण काही तरुणी विदेशातून भारतात प्रेग्नेंट होण्यासाठी येत असतात. ऐकून तुम्ही देखील हैराण झाले असाल. भारताचा केंद्रशासित प्रदेश लडाख त्याच्या सौंदर्यासाठी आणि खडकाळ पर्वतांसाठी ओळखला जातो. पण आज आम्ही तुम्हाला लडाखबद्दल अशीच एक गोष्ट सांगणार आहोत, जी तुम्ही कदाचित यापूर्वी कधीही ऐकली नसेल आणि ऐकल्यानंतर तुम्हाला देखील धक्का बसेल. रिपोर्टनुसार, लडाखमध्ये एक असं गाव आहे जिथे विदेशी महिला प्रेग्नेंट होण्यासाठी येत असतात.
लडाख भारतातील एक असा केंद्रशासित प्रदेश आहे जेथे जगभरातील पर्यटक येतात. तसं म्हणायला गेलं तर, भारतातील अनेक राज्या विदेशी पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. पण लडाख मधील असं एक गाव आहे जेथे विदेशी महिला प्रेग्नेंट होण्यासाठी येत असतात. यामागे कारण देखील खास आहे.
लडाखमध्ये कारगिलपासून 70 किलोमीटर अंतरावर एक गाव आहे. हे गाव आर्य व्हॅली म्हणून ओळखले जाते. असा दावा केला जातो की विदेशातील, विशेषतः युरोपीय देशांतील तरुणी येथे फक्त येथील पुरुषांपासून गर्भवती होण्यासाठी येतात. हे थोडे विचित्र वाटेल, परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे सत्य आहे.
काय आहे यामागचं कारण?
ब्रोकपा जमातीचे लोक लडाखच्या आर्य खोऱ्यात राहतात. असं म्हटले जातं की, हे लोक अलेक्झांडर द ग्रेटच्या सैन्याचे वंशज आहेत. एवढंच नाही तर येथील लोकं जगातील शेवटचे शुद्ध आर्य आहेत. असं देखील म्हटलं जातं. जेव्हा अलेक्झांडर द ग्रेट भारत सोडून जात होता तेव्हा त्याच्या सैन्याचा काही भाग भारतातच राहिला आणि त्यांचे वंशज अजूनही भारतात आहेत… आसा देखील दावा करण्यात येतो.
का येताता विदेशी महिला?
अलेक्झांडरच्या सैन्याप्रमाणेच विदेशी महिला चांगली उंची आणि मजबूत शरीरयष्टी असलेल्या मुलांच्या शोधात येथे येतात आणि गर्भवती झाल्यानंतर येथून निघून जातात. पूर्वी या समाजाच्या लोकांची इतकी क्रेझ नव्हती, पण इंटरनेटवर झालेल्या प्रचार आणि प्रसारामुळे विदेशी महिलांची संख्या याठिकाणी वाढत आहे. शारीरिक संबंध ठेवण्यासाठी विदेशी महिला येथील पुरुषांना पैसे देतात.
महत्त्वाची गोष्ट म्हणडे ब्रेकपा दावा करतात आर्यांचे वंशज आहेत, पण याचे कोणतेही सबळ पुरावे त्यांच्याकडे नाही. त्यांच्याबद्दल कोणताही तपास झालेला नाही, परंतु त्यांची उंची, शरीरयष्टी आणि काही कथा, लोककथांच्या आधारे ते शुद्ध आर्य असल्याचा दावा करतात. त्याच वेळी, अनेक तज्ञ म्हणतात की प्रेग्नेंसी टूरिज्म ही केवळ एक बनावट कथा आहे.