AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फॉर्च्यूनर गाडी, VIP नंबर अन्… इंदोरीकर महाराजांच्या जावायाचा थाट, नवा व्हिडीओ तुफान व्हायरल!

सध्या सोशल मीडियावर कीर्तनकार इंदोरीकर यांच्या जावयाचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो पूजा करत असलेल्या गाडीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

फॉर्च्यूनर गाडी, VIP नंबर अन्... इंदोरीकर महाराजांच्या जावायाचा थाट, नवा व्हिडीओ तुफान व्हायरल!
Indurikar MaharajImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 26, 2026 | 5:07 PM
Share

प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकार इंदोरीकर महाराज यांच्या कन्येचा, ज्ञानेश्वरीचा शाही विवाहसोहळा नुकताच पार पडला. ३ मे रोजी संगमनेरमध्ये अत्यंत थाटामाटात पार पडला. या भव्य सोहळ्यासाठी तब्बल १०० एकरांवर मंडप उभारण्यात आला होता. या विवाहाला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील अनेक दिग्गज राजकीय नेते, मंत्री, आमदार, खासदार आणि वारकरी संप्रदायातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. मात्र, लग्नानंतर आता इंदोरीकर महाराजांचे जावई एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत.

जावयाच्या गाडीवरील ‘त्या’ स्टिकरमुळे चर्चेला उधाण

सध्या इंदोरीकर महाराजांची मुलगी ज्ञानेश्वरी आणि जावई साहिल चिलप यांचा एक इन्स्टाग्राम व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे नवदाम्पत्य शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी गेले असता, त्यांनी तिथे एका गाडीची पूजा केली. मात्र, या व्हिडिओमध्ये गाडीवर लावण्यात आलेल्या ‘VVIP’ आणि ‘लोकसभा सदस्य (MP)’ या स्टिकर्सनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नेटकरी विचारतायत, चिलप घराण्यात खासदार कोण?

साहिल चिलप यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील माहितीनुसार, ही गाडी त्यांनी डिसेंबरमध्ये खरेदी केली होती. मात्र, नंतर या गाडीवर VVIP आणि MP (खासदार) असल्याचे स्टिकर लावण्यात आले. यावरून आता लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. साहिल चिलप हे स्वतः खासदार नसताना त्यांनी गाडीवर असा लोगो का लावला?, चिलप कुटुंबात किंवा नातेवाईकांमध्ये कोणी खासदार आहे का? की ही गाडी एखाद्या खासदाराला वापरण्यासाठी दिली जाते? आणि तसे असल्यास ते खासदार नेमके कोण आहेत? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत.

कोण आहेत साहिल चिलप?

ज्ञानेश्वरी यांचे पती साहिल चिलप हे नवी मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक सुनील विष्णू चिलप आणि मनीषा चिलप यांचे सुपुत्र आहेत. सध्या हे कुटुंब पनवेलमध्ये वास्तव्यास असले, तरी त्यांचे मूळ गाव जुन्नर तालुक्यातील काटेडे हे आहे. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी त्यांचा एक भव्य आणि आलिशान बंगला आहे, जिथून किल्ल्याचे सुंदर दृश्य दिसते. चिलप कुटुंब हे अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचे असून, त्यांच्या घरात २४ तास अखंड हरिपाठ सुरू असतो, अशी माहिती समोर आली आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा