VIDEO: ‘बर्थडे बॉय’ला मित्रांकडून वाढदिवसाचं अतरंगी सरप्राईज, हा व्हीडिओ पाहून तुम्ही पोट धरुन हसाल

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 31, 2021 | 10:24 AM

मित्र म्हटलं की मजामस्करी आणि थट्टा आलीच. हे मित्र कधी काय करतील, याचा नेम नसतो. याचा तंतोतंत प्रत्यय व्हीडिओमधून येतो. या व्हीडिओ एका मुलाचा वाढदिवस साजरा होत आहे. त्यासाठी केक, मेणबत्त्या, डोक्यावर टोप्या अशी सर्व जय्यत तयारीही आहे.

VIDEO: 'बर्थडे बॉय'ला मित्रांकडून वाढदिवसाचं अतरंगी सरप्राईज, हा व्हीडिओ पाहून तुम्ही पोट धरुन हसाल

Follow us on

मुंबई: सोशल मीडियावर तुम्हाला दररोज अनेक मजेशीर, एखाद्याची मस्करी करणारे किंवा गंमतीशीर व्हीडिओ पाहायला मिळतात. यापैकी काही व्हीडिओ अक्षरश: पोट धरून हसायल लावतात. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हीडिओत वाढदिवसाच्या दिवशी एका मुलाची मित्रांनी घेतलेली फिरकी पाहायला मिळते. (Birthday party video goes viral on Social Media)

नेमकं काय घडलं?

मित्र म्हटलं की मजामस्करी आणि थट्टा आलीच. हे मित्र कधी काय करतील, याचा नेम नसतो. याचा तंतोतंत प्रत्यय व्हीडिओमधून येतो. या व्हीडिओ एका मुलाचा वाढदिवस साजरा होत आहे. त्यासाठी केक, मेणबत्त्या, डोक्यावर टोप्या अशी सर्व जय्यत तयारीही आहे. वाढदिवसाच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे हा मुलगा केकवरील मेणबत्त्या फुंकतो. त्यानंतर सर्वजण ‘हॅपी बर्थ डे टू यू’ गायला सुरुवात करतात. त्यानंतर हा मुलगा केक कापेल असे वाटत असतानाच समोरून एक व्यक्ती केक काढून घेते.

त्यानंतर कॅमेरा वळतो आणि हे सर्वजण केकच्या दुकानात उभे असल्याचा उलगडा होता. मेणबत्त्या फुंकल्यानंतर केकच्या दुकानाचा मालक केक पुन्हा काचेच्या आत ठेवून देतो. त्यानंतर सर्वजण केकच्या दुकानाच्या बाहेर पडतात. यावेळी वाढदिवस असणाऱ्या मुलाच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे आहेत.

सोशल मीडियावर तुफान व्हायरल

सोशल मीडियावर या व्हीडिओवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. या व्हीडिओवरील लोकांच्या मजेशीर कमेंटसही तितक्याच मनोरंजक आहेत. Gudguda jokes या फेसबुक अकाऊंटवरुन हा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हीडिओ नक्की कुठला आहे, हे अद्याप कळालेले नाही. मात्र, आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हीडिओ पाहिला असून अनेकांनी तो लाईकही केला आहे.

संबंधित बातम्या:

VIDEO: माझे दोन दातं तुटलं, मोबाईल पण गेला, आता आईपण मारेल; हा व्हायरल व्हीडिओ पाहिलात का?

VIRAL: पिवळी झालेली पँट घेऊन प्रवासी विमानतळावर उतरला, तपासणीनंतर समोर आलं धक्कादायक सत्य

VIDEO: हवेत तरंगणारा पिझ्झा, अंतरावीरांच्या फ्लोटिंग पिझ्झा पार्टीचा हा व्हीडिओ पाहिलात का?

(Birthday party video goes viral on Social Media)

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI