जयमालाच्या वेळी नववधू भडकली आणि नवरदेवावर मिठाई फेकली! VIDEO

रचना भोंडवे, Tv9 मराठी

Updated on: Jan 22, 2023 | 6:02 PM

नवऱ्यावर रागावते आणि जी मिठाई ती नवरदेवाला खाऊ घालत असते ती त्या मिठाईला जयमालाच्या स्टेजवर फेकते. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जयमालाच्या स्टेजवर वधू-वर उभे आहेत

जयमालाच्या वेळी नववधू भडकली आणि नवरदेवावर मिठाई फेकली! VIDEO
Marriage video
Image Credit source: Social Media

लग्न हे जन्म-जन्माचे बंधन आहे. म्हणूनच हे बंधन बांधण्यापूर्वी मुलगा आणि मुलगी दोघांचीही संमती आवश्यक असते आणि त्याचबरोबर दोन्ही कुटुंबांची संमतीही खूप महत्त्वाची असते. मात्र आजकाल लव्ह मॅरेजही खूप ट्रेंडी आहेत. घरच्यांची सहमती नसली तरी मुलगा आणि मुलगी एकमेकांशी लग्न करत असतात. अशी प्रकरणे अनेकदा पाहायला आणि ऐकायला मिळतात, पण अनेकदा असे घडते की घरच्यांच्या दबावाखाली मुला-मुलींना इतरत्र लग्न करण्यास भाग पाडले जाते. यासंदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुमच्या मनात पहिला विचार येईल तो म्हणजे वधूवर लग्नासाठी दबाव टाकण्यात आला आहे.

खरं तर या व्हिडिओमध्ये वधू लग्नाआधी नवऱ्यावर रागावते आणि जी मिठाई ती नवरदेवाला खाऊ घालत असते ती त्या मिठाईला जयमालाच्या स्टेजवर फेकते. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जयमालाच्या स्टेजवर वधू-वर उभे आहेत आणि वधूच्या मैत्रिणीही तिथे उपस्थित आहेत.

यावेळी वधू प्रथम ताटातून फुले काढून नवऱ्यावर फेकून त्याचे स्वागत करते आणि त्यानंतर ती मिठाई घेऊन नवऱ्याला खाऊ घालण्यासाठी पुढे सरकते. मग नवरदेवाने मिठाई खाण्यासाठी तिचा हात धरण्याचा प्रयत्न करताच वधू चिडते आणि मिठाई स्टेजच्या बाहेर फेकते. आश्चर्याची बाब म्हणजे यावेळी नवरदेव शांतपणे स्टेजवर उभा राहतो.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @HasnaZarooriHai नावाच्या आयडीसह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘जर मुलगी कुणा दुसऱ्यासोबत असेल आणि तरीही दुसऱ्यासोबत तिचे लग्न होत असेल तर असेच घडते’.

30 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 9 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाइक देखील केला आहे.

त्याचबरोबर लोकांनी व्हिडिओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. वधूचा राग असूनही नवरदेवाचा शांत स्वभाव पाहून एका युजरने लिहिले की, ‘मुलगा जेंटलमॅन निघाला’.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI