AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रकचा असा अपघात यापूर्वी तुम्ही कदाचित पाहिला नसेल; नेटकरी म्हणतात आत्म्याने शरीराचा त्याग केला!

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका ट्रकचा आहे. या ट्रकमध्ये मोठ्याप्रमाणात सामान भरलेले आहे. हा ट्रक एका कच्चा रस्त्याने चालला आहे. लोड अधिक असल्याने हा ट्रक पलटी होतो, मात्र आश्चर्याची बाब म्हणजे वजन जास्त असल्याने पलटी झाल्यानंतर या ट्रकचे दोन भाग होतात.

ट्रकचा असा अपघात यापूर्वी तुम्ही कदाचित पाहिला नसेल; नेटकरी म्हणतात आत्म्याने शरीराचा त्याग केला!
ट्रक अपघाताचा व्हायरल व्हिडीओ
| Updated on: Feb 17, 2022 | 10:56 PM
Share

Viral video : तुम्ही जर इंटरनेटवर (internet) सक्रिय असाल तर तुम्ही दररोज अनेक व्हायरल व्हिडीओ (Viral video) देखील पाहात असाल. सोशल मीडियावर (social media) कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा काही भरोसा नाही. सोशल मीडियावर अनेक आश्चर्यकारक व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे व्हिडीओ पाहून नेटकरी तोंडात बोट घालतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका ट्रकचा आहे. या ट्रकमध्ये मोठ्याप्रमाणात सामान भरलेले आहे. हा ट्रक एका कच्चा रस्त्याने चालला आहे. लोड अधिक असल्याने हा ट्रक पलटी होतो, मात्र आश्चर्याची बाब म्हणजे वजन जास्त असल्याने पलटी झाल्यानंतर या ट्रकचे दोन भाग होतात. या अपघातात ट्रकचालक सुखरुप बचावतो. या व्हिडीओवर लाईकचा पाऊस पडत असून, नेटकरी अनेक मजेदार कमेंटस करत असल्याचे पहायला मिळत आहे.

व्हिडीओमध्ये नेमक काय?

तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक ट्रक समोरून येत आहे. या ट्रकमध्ये वजन प्रचंड प्रमाणात असल्याने तो हेलकावे खात आहे. तो ट्रक ज्या रस्त्याने चालला आहे, तो रस्ता देखील बरोबर नाही, हा रस्ता कच्चा आहे. ट्रक ओव्हरलोड असल्याने आणि त्यात भरीसभर रस्ता खराब असल्याने हा ट्रक पलटी होतो. मात्र पलटी होताना या ट्रकचे दोन भाग होतात. वरचा भाग खाली कोसळतो. या अपघातामधून ट्रकचालक सुखरूप बचावतो. या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना एका युजरने म्हटले आहे की, जेव्हा शरीराचे वजन जास्त असते, तेव्हा आत्मा शरीराचा त्याग करते. अशाच अनेक मजेदार कमेंट या व्हिडीओवर येत असल्याचे पहायला मिळत आहे.

हजारो जणांनी पाहिला व्हिडीओ

हा व्हिडीओ इंडियन फॉरेस्ट ऑफिसर सुसंता नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्यांनी या व्हिडीओला शेअर करताना एक समर्पक असे कॅप्शन देखील दिले आहे. ‘ ‘आत्मा’ ने ‘शरीर’ का त्याग कर दिया’ असं कॅप्शन त्यांनी आपल्या या व्हिडीओला दिले आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून, आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या व्हिडीओवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.

ट्रकचा व्हायरल व्हिडीओ

संबंधित बातम्या

Online Classesचा ‘असा’ही परिणाम, चिमुरड्याचा ‘हा’ Viral Video पाहा, हसू आवरणार नाही

Viral : सर्वकाही ठीक चालू असेल तर मी येवू ना शहरात? AjayDevgn याला टॅग करत Anand Mahindra यांनी केलं Tweet

कोल्हाही घेतोय बँजोच्या सुरांचा आनंद, 1 कोटींहून जास्तवेळा पाहिला गेलाय ‘हा’ Viral Video

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...