Video: iPhone 17 साठी मुलीची अजब आयडिया, थेट QR कोड… व्हिडीओ पाहून लावाल डोक्याला हात!
आयफोन 17 प्रो मॅक्स खरेदी करण्यासाठी एका मुलीने सोशल मीडियावर लोकांकडून मदत मागितली आहे. तिने एक व्हिडीओ बनवून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणते की, जर लोक तिला एक-एक, दोन-दोन रुपयेही देतील, तर तिचे हे नवीन आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होईल.

नुकतेच लॉन्च झालेल्या अॅपलच्या आयफोन 17 प्रो मॅक्स (Apple iPhone 17 Pro Max) बद्दल भारतातील लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी लोक काहीही करण्यास तयार आहेत. अनेकजण स्टोअरबाहेर तासन्तास रांगेत उभे राहत आहेत, जेणेकरून त्यांना हा नवीन फोन कसातरी मिळेल. दरम्यान, काही लोक असेही आहेत, ज्यांच्याकडे हा फोन खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत, म्हणून ते लोकांकडून दान मागत आहेत. अशीच एक मुलगी सध्या खूप चर्चेत आहे. या मुलीने हा फोन खरेदी करण्यासाठी आपल्या फॉलोअर्सकडून पैसे मागितले आहेत. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशच्या लखीमपूर येथील रहिवासी ‘ब्यूटी क्वीन’ माही सिंह भारतात सुमारे 1.49 लाख रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी आपल्या फॉलोअर्सकडून एक-एक, दोन-दोन रुपये मागत आहे. व्हिडीओमध्ये ती बोलताना दिसत आहे की, तीन महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांनी तिला आयफोन 16 भेट दिला होता, पण त्यांनी अॅपलचा नवा फोन खरेदी करण्यास नकार दिला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती म्हणते, ‘आयफोन 17 प्रो नुकताच लॉन्च झाला आहे आणि मला त्याचा रंग खूप आवडला आहे. तीन महिन्यांपूर्वी माझ्या वडिलांनी मला आयफोन 16 खरेदी करून दिला होता. आता मी माझ्या 21 ऑक्टोबरच्या वाढदिवसाला हा नवा फोन खरेदी करू इच्छिते, पण माझे वडील मला हा फोन खरेदी करुन देणार नाहीत.’
वाचा: 19-20 वर्षाच्या मुलींना माझा व्हिडीओ… प्राजक्ता माळीने सांगितला धक्कादायक अनुभव
लखीमपुर की ब्यूटी क्वीन माही सिंह एक एक,दो दो रुपये मांग रही है 17 प्रो मैक्स फोन लेने के लिए….. pic.twitter.com/YvpoJymsH9
— Sajid Ali (@Sajid7642) September 25, 2025
सोशल मीडियावर लोकांकडून मागितले पैसे
माही पुढे म्हणाली, ‘जर तुम्ही सर्वांनी एक-दोन रुपयेही मदत केली, तर मी हा फोन खरेदी करू शकेन आणि मी मनापासून तुमचे आभार मानेन. यामुळे माझे स्वप्न पूर्ण होईल. खरे सांगायचे तर, मला हा फोन इतका आवडला आहे की, त्याबद्दल व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत.’
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) वर @Sajid7642 या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 38 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तसेच शेकडो लोकांनी व्हिडीओला लाइक केले आहे आणि विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने मिश्किलपणे लिहिले आहे, ‘मी विचार करत आहे की, मलाही माझे स्वप्न पूर्ण करायचे आहे. मी पण स्कॅनर लावू का?’ तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे, ‘याला म्हणतात डिजिटल भिक.’
