AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिन्याच्या 200000 पगारावर “गर्लफ्रेंडची नोकरी”! 2 युवक गर्लफ्रेंडच्या शोधात

त्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक जाहिरात दिलीये. या मुलांच्या एका मैत्रिणीने ही जाहिरात पोस्ट केलीये. आता ही जाहिरात चर्चेचा विषय बनलीय.

महिन्याच्या 200000 पगारावर गर्लफ्रेंडची नोकरी! 2 युवक गर्लफ्रेंडच्या शोधात
need girlfriendImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Sep 22, 2022 | 5:03 PM
Share

काही दिवसांपूर्वी सॉफ्टवेअर इंजिनिअर नवरा नको अशी एक जाहिरात प्रचंड व्हायरल होत होती. अशा हटके जाहिराती लगेच व्हायरल होतात. अशीच अजून एक जाहिरात व्हायरल होतीये. दोन तरुणांना गर्लफ्रेंड हव्या असतात. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक जाहिरात दिलीये. या मुलांच्या एका मैत्रिणीने ही जाहिरात पोस्ट केलीये. आता ही जाहिरात चर्चेचा विषय बनलीय. थायलंडची रहिवासी असलेल्या या महिलेने दोन चिनी मित्रांच्या वतीने पोस्ट केलेल्या जाहिरातीत लिहिलंय की, तिच्या मित्रांना थाई गर्लफ्रेंड हवी आहे.

त्याबदल्यात त्यांना, गर्लफ्रेंडला दरमहा 2.16 लाख रुपये पगार दिला जाणार आहे. गर्लफ्रेंडनी काम चांगलं केलं तर त्यांना 2 लाख रुपयांव्यतिरिक्त पैसेही मिळतील, असा दावाही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

फेसबुक युजर ओके माई माई यांनी गेल्या आठवड्यात अशी पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने लिहिले की, ‘माझे दोन चिनी मित्र गर्लफ्रेंडच्या शोधात आहेत. प्रेयसीचे वय 18 ते 23  वर्षे दरम्यान असावे. गर्लफ्रेंड्सना पगार म्हणून 2.16 लाख रुपये मिळतील, त्यांना तुमचं काम आवडलं तर त्याहीपेक्षा जास्त. दोघेही माझे मित्र आहेत, ते नीट आणि क्लीन आहेत”

अटीही त्यांनी स्पष्ट केल्या. पोस्टनुसार, ज्या उमेदवारांना गर्लफ्रेंड म्हणून काम करायचे आहे त्यांनी कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज घेऊ नये. ते कामात चांगले असले पाहिजेत. कोणत्याही प्रकारच्या समस्येशी ती झगडत नसावी. त्यांना चिनी भाषा बोलता आली पाहिजे.

ओके माई माईची ही पोस्ट वाचून थायलंडच्या अनेक महिलांनी या नोकरीची इच्छा व्यक्त केली. कमेंट सेक्शनमध्ये काही महिलांनी नी हाओ (हॅलो) हा चिनी शब्दही लिहिला होता.त्याचबरोबर अनेक युजर्सनी या फेसबुक पोस्टमध्ये आपल्या इतर मैत्रिणींनाही टॅग केलंय.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना