AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hotel Room : पार्टनरसोबत हॉटेलमध्ये जाताय? रुममध्ये घुसताच अगोदर 10 वेळा ‘या’ गोष्टी चेक करा, नाहीतर…

Hotel Room : आपण आपल्या पार्टनरसोबत हॉटेल रुममध्ये गेल्यानंतर सर्वात आधी काही गोष्टी तपासणे महत्त्वाचे असते. कारण कधीकधी काही हॉटेल रुममध्ये कॅमेरे लावलेले असतात. आता ते कसे चेक करायचे एकदा वाचा...

Hotel Room : पार्टनरसोबत हॉटेलमध्ये जाताय? रुममध्ये घुसताच अगोदर 10 वेळा ‘या’ गोष्टी चेक करा, नाहीतर...
Travel TipsImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 17, 2026 | 11:03 AM
Share

वेगवेगळ्या ठिकाणी पार्टनरसोबत फिरायला जायला अनेकांना आवडते. मग ते वेगळ्या राज्यात किंवा परदेश असो वा आपल्याच शहरात एखाद्या आवडत्या हॉटेलमध्ये राहण्यासाठी जाणे असो. प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार पर्याय निवडतात. पण आपण बऱ्याचदा बाहेर फिरायला गेल्यावर तिथल्या आदरातिथ्याला भुलून तिथल्या व्यवस्थेवर आणि माणसांवर डोळे झाकून विश्वास ठेवतो. परंतु, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात हाच गाफीलपणा आपल्याला मोठ्या अडचणीत आणू शकतो. काही समाजकंटकांकडून पर्यटकांच्या खासगी क्षणांचे व्हिडीओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करणे किंवा ते व्हिडीओ व्हायरल करणे अशा घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे हॉटेलमध्ये पाऊल ठेवताच काही गोष्टींची खातरजमा करणे अत्यंत आवश्यक आहे.

हॉटेलमध्ये उतरल्यानंतर सर्वात आधी अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना मर्यादा पाळणे गरजेचे आहे. गप्पांच्या ओघात वाहत जाऊन आपली वैयक्तिक किंवा कौटुंबिक माहिती कोणाशीही शेअर करू नका, कारण या माहितीचा गैरवापर करून फसवणूक होण्याची शक्यता असते. हॉटेलच्या रिसेप्शनवरून खोलीची किल्ली घेतल्यानंतर कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपल्या खोलीत घेऊन जाऊ नका आणि अतिसलगी करणाऱ्या लोकांपासून नेहमी अंतर राखून राहा. याशिवाय, ऑनलाईन बुकिंग करताना नेहमी हॉटेलचा दर्जा, ग्राहकांचे रिव्ह्यू आणि रेटिंग आवर्जून तपासा. इतर ग्राहकांनी सुरक्षेच्या दृष्टीने दिलेली सकारात्मक प्रतिक्रिया पाहूनच खोली बुक करण्याचा निर्णय घ्यावा.

या गोष्टी आवर्जुन चेक करा

खोलीत प्रवेश केल्यानंतर तिथली सुरक्षा व्यवस्था नीट तपासून घेणे महत्त्वाचे आहे. खोली सुरक्षित ठिकाणी आहे का, दरवाजे आणि खिडक्यांचे लॉक व्यवस्थित लागतात का, खिडक्यांना ग्रिल आहेत का, तसेच खोलीत येण्यासाठी दुसरा कोणताही गुप्त मार्ग किंवा दरवाजा नाही ना, याची पडताळणी करा. बेडच्या खाली, पडद्यांच्या मागे, घड्याळ, फुलदाणी किंवा भिंतीवरील फोटो फ्रेममध्ये कोणतीही शंकास्पद वस्तू, मायक्रोफोन अथवा छुपा कॅमेरा लपवला आहे का, हे एकदा व्यवस्थित तपासावे.

पहिले खोलीतील आरसा पाहा

हॉटेलच्या खोलीतील आरसा (Mirror) तपासणे हा सुरक्षेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आरशाच्या पाठीमागे छुपे कॅमेरे किंवा रेकॉर्डिंग गॅझेट्स असण्याची शक्यता असते. आजकाल असे छुपे कॅमेरे शोधण्यासाठी विविध मोबाईल ॲप्स उपलब्ध आहेत, ज्यांची मदत घेतली जाऊ शकते. तसेच, खोलीच्या मुख्य दरवाजाच्या छिद्राची (Peephole) तपासणी करा. खोलीत असताना दरवाजावर नेहमी ‘डू नॉट डिस्टर्ब’ (Do Not Disturb) चा बोर्ड लावून ठेवावा, जेणेकरून तुमच्या परवानगीशिवाय हॉटेलमधील कोणताही कर्मचारी किंवा इतर व्यक्ती थेट आत येऊ शकणार नाही. थोडीशी सतर्कता बाळगल्यास तुमचा प्रवास सुरक्षित आणि आनंददायी होऊ शकतो.

Follow Us
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी...
धाराशिवमध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादन निम्म्यावर; शेतकरी संकटात
80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; शिवराज मोरे....
Shivraj More : 80 तास झाले, तरी मला अडकवण्याचे प्रयत्न सुरूच; MPSC कार्यकर्ता शिवराज मोरे यांचा खळबळजनक दावा
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन
MPSC आंदोलनात नेमकं काय घडतंय? नाईट लाईफ राडा, मद्यपान अन्... नवनाथ बन यांचा आरोपांनी खळबळ
याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे
Shivraj More : MPSC Students Protest : याला गुंडगिरी म्हणत असाल तर...; नवनाथ बन यांच्या आरोपांवर शिवराज मोरे यांचा पलटवार, नेमकं प्रकरण काय?
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार...
दोन तास विद्यार्थ्यांना ताटकळत ठेवलं, अखेर परीक्षा रद्द, रोहित पवार म्हणाले...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत...
महाज्योती परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ, संगणकच नाहीत... विद्यार्थिनींच्या संतापानंतर परिक्षाच रद्द
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वेगळं वळण; रोहित पवारांनी केले गंभीर आरोप
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक