Earth Day 2021 | उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावा, गुगलचा वसुंधरा दिनानिमित्त खास संदेश

उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक वयातील व्यक्तीने एक तरी झाड लावावे, असा संदेश या डुडलच्या माध्यमातून देण्यात आला आहे. (Google Doodle 0n Earth Day 2021)

Earth Day 2021 | उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावा, गुगलचा वसुंधरा दिनानिमित्त खास संदेश
google doodle


Google Doodle Earth Day 2021 मुंबई : आज जागतिक वसुंधरा दिन (World Earth Day). पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी जगभरात दरवर्षी 22 एप्रिलला ‘जागतिक पृथ्वी दिवस’ किंवा ‘World Earth Day’ साजरा केला जातो. यंदा जागतिक पृथ्वी दिनानिमित्त लोकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी गुगलने खास डुडल तयार केले आहे. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक वयातील व्यक्तीने एक तरी झाड लावावे, असा संदेश या डुडलच्या माध्यमातून देण्यात आला आहे. (Google Doodle 0n Earth Day 2021)

गुगलच्या डुडलमध्ये नेमकं काय?

जागतिक पृथ्वी दिनानिमित्त गुगलने साकारलेल्या डुडलमध्ये एका मोठ्या वृक्षाच्या सावलीत एक महिला पुस्तक वाचत असते. त्यानंतर सुरुवातीला एक लहान मुलगी रोपटं लावते. ते रोपटं काही वर्षांनी मोठ्या वृक्षात रुपांतरित होते. यानंतर ती तिच्या मुलाला रोप लावायला शिकवते. कालांतराने तेही झाड बहरतं. त्यानंतर तो व्यक्ती त्याच्या मुलांना रोप लावायला देतो आणि तेही रोप छान बहरते. यानंतर पुढे काही वर्षांनी प्रत्येक जण इतरांना वृक्षरोपण करण्यास प्रोत्साहन करतो, असे या व्हिडीओत दाखवण्यात आले आहे.

या व्हिडीओतून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला झाडे लावण्याची शिकवण देत असल्याचे स्पष्ट होत आहे. यातून आपण कशाप्रकारे वसुंधरेचे संवर्धन केले पाहिजे याचाही धडा मिळत आहे.

पृथ्वी दिन का साजरा करतात?

जगभरात 22 एप्रिल हा वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो. जेव्हा पृथ्वी दिन सुरु झाला तेव्हा तो 21 आणि 22 एप्रिल असे दोन दिवस साजरा केला जात असे. मात्र कालांतराने 1970 पासून 22 एप्रिलला पृथ्वी दिन साजरा करण्यात आला.

वसुंधरा दिनाची संकल्पना अमेरिकेतील गेलार्ड नेल्सन यांनी मांडली. त्यांनी अमेरिकेतील 2 कोटींपेक्षा जास्त लोकांमध्ये पर्यावरणाच्या समस्यांबाबत जनजागृती केली. प्रदूषण आणि वन्यजीवांचा ऱ्हास या मुद्यावर त्यांनी आवाज उठवला. हवा, पाणी, वने आणि वन्यजीव, निसर्ग यांच्या संरक्षणासाठी त्यांनी तिथे राजकीय दबाव निर्माण केला. त्यानंतर 22 एप्रिल हा दिवस वसुंधरा दिन किंवा Earth day म्हणून मानला जाऊ लागला. (Google Doodle 0n Earth Day 2021)

संबंधित बातम्या : 

Fact Check | Oxygen Level : कापूर, लवंग, ओवा आणि नीलगिरी तेलामुळे वाढवू शकते ऑक्सिजन पातळी? जाणून घ्या सत्य

माझी जमीन, माझं राज्य ! भर रस्त्यात वाघाने मारली बैठक, पुढे काय झालं ?

आग ओकणाऱ्या उन्हात गरोदर महिला DSP कोरोना ड्युटीवर उभी, दीड शहाणे मात्र थोबाड वर करुन भटकंतीला

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI