आग ओकणाऱ्या उन्हात गरोदर महिला DSP कोरोना ड्युटीवर उभी, दीड शहाणे मात्र थोबाड वर करुन भटकंतीला

लॉकडाऊनमध्ये दंतेवाडाच्या डीएसपी शिल्पा साहू रस्त्यावर फिरणाऱ्या, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना कोरोना विषाणूची दाहकता समजावून, घरी बसण्याचा सल्ला देत आहेत. विशेष म्हणजे डीएसपी शिल्पा साहू (DSP Shilpa Sahu) या स्वतः 5 महिन्यांच्या गर्भवती आहेत.

आग ओकणाऱ्या उन्हात गरोदर महिला DSP कोरोना ड्युटीवर उभी, दीड शहाणे मात्र थोबाड वर करुन भटकंतीला
शिल्पा साहू

मुंबई : देशच नव्हे तर, जगभरात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. भारतातही कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा ही दुसरी लाट अधिक विध्वंसक असल्याचे सिद्ध झाले आहे. परिणामी देशातील अनेक राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन किंवा लॉकडाऊन सदृश्य निर्बंध लादण्यात आले आहेत. इतके निर्बंध लादलेले असताना देखील लोक निष्काळजीपणे रस्त्यांवर भटकत आहेत. मात्र, या कठीण काळात कोरोना योद्धे अर्थात पोलीस, डॉक्टर हे अतिशय खंबीरपाने या संकटाशी दोन हात करत आहेत. याचेच मूर्तिमंत उदाहरण ठरल्या दंतेवाडा, छत्तीसगडच्या डीएसपी शिल्पा साहू (5 month Pregnant DSP Shilpa Sahu doing her duty in on road at Chhattisgarh).

लॉकडाऊनमध्ये दंतेवाडाच्या डीएसपी शिल्पा साहू रस्त्यावर फिरणाऱ्या, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना कोरोना विषाणूची दाहकता समजावून, घरी बसण्याचा सल्ला देत आहेत. विशेष म्हणजे डीएसपी शिल्पा साहू (DSP Shilpa Sahu) या स्वतः 5 महिन्यांच्या गर्भवती आहेत. असे असूनही, त्या कर्तव्यावर हजर होऊन, भर उन्हात उभे राहून लोकांना विनाकारण घर न सोडण्याचा सल्ला देत आहे. तसेच कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन देखील त्या करत आहे.

भर उन्हात कर्तव्य बजावतायत गर्भवती डीएसपी

कोरोनाच्या दुसर्‍या लाटात रणरणत्या उन्हात रस्त्यावर उभ्या राहून त्या आपले कर्तव्य बजावत आहे. हे छायाचित्र सोमवारचे आहे, जेव्हा स्वत: डीएसपी शिल्पा रस्त्यावर उतरल्या आणि अनावश्यकपणे घर सोडणाऱ्या लोकांना सल्ला देत आहेत. आपल्या टीमसमवेत कर्तव्यावर हजर असलेल्या त्यांनी चलान कापण्यासारखी कठोर अ‍ॅक्शनही घेतली. शिल्पा यांनी लोकांना आवाहन केले की, आज आम्ही रस्त्यावर उभे आहोत, जेणेकरून तुम्ही तुमच्या घरात सुरक्षित राहू शकाल (5 month Pregnant DSP Shilpa Sahu doing her duty in on road at Chhattisgarh).

नेटकऱ्यांनी केले कौतुक

(5 month Pregnant DSP Shilpa Sahu doing her duty in on road at Chhattisgarh)

आयपीएस अधिकारी दिपांषु काब्रा यांनी मातृत्वासह कर्तव्य बजावणाऱ्या शिल्पा साहू यांचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. यावर नेटकरी देखील भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी शिल्पा यांचे खूप कौतुक केले आहे. इतक्या कठीण काळात आपल्या गर्भातील बाळाची आणि सामान्य जनतेची काळजी घेणाऱ्या या महिला अधिकाऱ्याची वाहवा केली आहे. तर, काहींनी मात्र, त्यांनी स्वतःची आणि बाळाची काळजी घ्यावी, काम करू नये म्हणत बोल देखील लगावले आहेत.

वाचा प्रतिक्रिया

 (5 month Pregnant DSP Shilpa Sahu doing her duty in on road at Chhattisgarh)

हेही वाचा :

Fact Check | Oxygen Level : कापूर, लवंग, ओवा आणि नीलगिरी तेलामुळे वाढवू शकते ऑक्सिजन पातळी? जाणून घ्या सत्य

Video: मास्क का घातला नाही म्हणून जोडप्याला पोलिसांनी ‘हटकलं’, तर बया थेट ‘किसवर’ आली, बघा काय घडलं?

Published On - 12:34 pm, Tue, 20 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI