Video: मास्क का घातला नाही म्हणून जोडप्याला पोलिसांनी ‘हटकलं’, तर बया थेट ‘किसवर’ आली, बघा काय घडलं?

दिल्लीच्या दर्यागंजमध्ये तर एका महिलेला मास्क न घातल्याबद्दल विचारले असात ती थेट किसवर आली आहे. (delhi police corona mask women kissing)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:02 PM, 18 Apr 2021
Video: मास्क का घातला नाही म्हणून जोडप्याला पोलिसांनी 'हटकलं', तर बया थेट 'किसवर' आली, बघा काय घडलं?
महिला अशा प्रकारे पोलिसांशी उद्धट भाषेत बोलली.

दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आख्ख्या भारताची झोप उडाली आहे. कधी एकदाचा हा कोरोना जातो असं  प्रत्येकाला झालंय. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी देशभरात अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केले नाही तर पोलीस आणि प्रशासनाकडून कडक कारवाई केली जात आहे. मात्र, काही ठिकाणी पोलिसांच्या या कारवाईला विरोध होताना दिसतोय. दिल्लीच्या दर्यागंजमध्ये तर एका महिलेला मास्क न घातल्याबद्दल विचारले असता ती थेट किसवर आली आहे. “हा माझा पती आहे. माझ्या मनात आलं तर मी त्याला किससुद्धा करेल,” असे उत्तर या महिलेने दिलं आहे. महिलेच्या या थेट किसपर्यंत जाण्यामुळे तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. (Delhi Police ask women about mask and Corona law she spoke rudely with police and said will kiss husband)

नेमका प्रकार काय ?

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये कोरोनामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. परिस्थिती बिघडल्यामुळे दिल्लीमध्ये अनेक कोरोना प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत. जागोगाजी पोलीस गस्त घालत असून कारमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तपासणी करत आहेत. दर्यांगज येथे एका जोडप्याला असंच पोलिसांनी मास्क न घातल्यामुळे टोकलं. पोलिसांनी मास्कबद्दल विचारल्यामुळे त्यातील महिला पोलिसांवर थेट भडकली. तिने पोलिसांशी अरेरावी करत शिवराळ भाषा वापरली. तसेच मास्क घालणार नाही. काय करणार असा उलट सवालही केला. या प्रकारामुळे रस्त्यावर काही काळासाठी तणावाचं वातवरण निर्माण झालं होतं.

महिला थेट किसवर आली

पोलिसांनी या महिलेला मास्क न घालण्याचे कारण विचारले. त्यावर उत्तर म्हणून या महिलेना कोरोना वगैरे काही नाही. कोरोनाच्या नावाखाली आम्हाला परेशान केलं आहे. मी मास्क लावणार नाही; काय करणार ? असे म्हणत पोलिसांना थेट आव्हान दिले. तसेच आपल्या पतीकडे बोट करत हा माझा पती आहे. माझ्या मनात आलं तरी मी त्याला आता इथेच किस करेल, असंसुद्धा ही महिली म्हणाली. पोलिसांसोबत उद्धटपणे बोलतानाचा हा व्हिडीओ नंतर काही क्षणांत व्हायरल झाला.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, ही घटना घडताना पोलिसांसोबत महिला पोलीस नसल्यामुळे दर्यागंजच्या रस्त्यावर काही काळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तसेच या महिलेचा हेकेखोरपणा आणि उद्धटपणे बोलण्यामुळे सर्वांनी तोंडात बोट घातले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

इतर बातम्या :

Special Report | ऑक्सिजन, रेमडेसिव्हीरचा तुटवडा; रुग्णांचे हाल, परिस्थिती चिंताजनक

Corona Cases and Lockdown News LIVE : चंद्रपूर जिल्ह्यात 1584 नव्या रुग्णांची नोंद, दिवसभरात 25 जणांचा मृत्यू

कोरोनाचा विद्रूप चेहरा ! शेवटच्या श्वासापर्यंत बेडसाठी वणवण, शेवटी बसस्थानकात पत्नीसमोर प्राण सोडला

(Delhi Police ask women about mask and Corona law she spoke rudely with police and said will kiss husband)