माझी जमीन, माझं राज्य ! भर रस्त्यात वाघाने मारली बैठक, पुढे काय झालं ?

एका बलशाली वाघाने भर रस्त्यात येऊन चक्क बैठक मारली आहे. या वाघाचा फोटो सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. (animal tiger on road viral photo)

माझी जमीन, माझं राज्य ! भर रस्त्यात वाघाने मारली बैठक, पुढे काय झालं ?
tiger
Follow us
| Updated on: Apr 21, 2021 | 7:31 PM

मुंबई : जंगल ही एक मोठी नैसर्गिक संपत्ती आहे. वृक्ष, प्राणी यांच्या मदतीमुळेच सध्या पर्यावरणाचे संतुलन कायम आहे. जंगलात राहणारे काही प्राणी आपल्याला मनमोहक वाटतात तर काही प्राणी समोर दिसताच आपल्या पाचावर धारण बसते. वाघ हा त्यापैकीच एक प्राणी. कधी आपल्याला वाघ (Tiger) प्रत्यक्ष दिसलाच तर सर्वात आधी आपण भेदरुन जातो. आपला जीव वाचण्याकडे सर्वात आधी आपला कल असतो. असाच एक प्रकार एका जंगलात घडला आहे. एका बलशाली वाघाने भर रस्त्यात येऊन चक्क बैठक मारली आहे. या वाघाचा फोटो सध्या  चर्चेचा विषय ठरला आहे. (wild animal Tiger sat on road all vehicles stopped photo goes viral)

प्रवाशांची तारांबळ

एका बलशाली वाघाने थेट रस्त्यावर बैठक मारल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहणांची येजा आहे. मात्र, वाहणं असूनसुद्धा वाघाने कोणतीही भीती न बाळगता थेट रस्त्यावरच बैठक मारली आहे. हा वाघ रस्त्यावर मस्तपणे पहुडला आहे. तर सुसरीकडे भर रस्त्यात बसल्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या लोकांची पुरती तारांबळ उडाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. हा वाघ कधी उठतो आणि आम्ही कधी एकदाचं समोर जातो, असं या प्रवाशांना झालं आहे. वाघ उठून जाण्याची वाट पाहण्याशिवाय या प्रवाशांसमोर कोणताही पर्याय नसल्यमुळे ते ताटकळत बसल्याचे दिसत आहे.

पाहा फोटो :

आएफएस अधिकाऱ्याकडून फोटो ट्विट

मूळात हा फोटो आएफएस ऑफिसर परवीन कासवान यांनी शेअर केला आहे. त्यांनी या फोटोसोबत एक मजेदार कॅप्शनसुद्धा दिलं आहे. ‘माझी जमीन, माझा नियम, भारत सोडून आणखी कोठे, तुमचा विचार काय ?,’ असं त्यांनी आपल्या कॅप्शनमध्ये लिहलंय.

दरम्यान, कासवान यांनी हा फोटो अपलोड केल्यानंतर या पोटोची शोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. एका नेटकऱ्याने तर फोटोला रिट्वीट करत बिग बॉस असं लिहलं आहे.

इतर बातम्या :

VIDEO : सेक्स एज्युकेशन विषयी माहिती सांगणारा मिल्कशेकचा व्हिडीओ, अनेकांकडून आक्षेप, मोठा गदारोळ, अखेर ऑस्ट्रेलिया सरकार नमलं

VIDEO | बाहेर जाऊ नकोस, कोरोना होईल, आजीचा पदर धरत चिमुकलीची आर्त हाक

गरीब कोरोनाग्रस्तांसाठी माझा पगार घ्या, भाजी विक्रेत्याच्या मुलाच्या मेसेजने डॉक्टर गदगदले

(wild animal Tiger sat on road all vehicles stopped photo goes viral)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.