गरीब कोरोनाग्रस्तांसाठी माझा पगार घ्या, भाजी विक्रेत्याच्या मुलाच्या मेसेजने डॉक्टर गदगदले

"माझा रुग्ण भाजी विक्रेता आहे. हा मेसेज त्याच्या मुलाने पाठवला आहे. माझ्याकडे शब्द अपुरे पडले, हे खरे हिरो आहेत" असं डॉ. स्नेहिल मिश्रा यांनी लिहिलं आहे. (Mumbai Doctor message of Vegetable Vendor Son)

गरीब कोरोनाग्रस्तांसाठी माझा पगार घ्या, भाजी विक्रेत्याच्या मुलाच्या मेसेजने डॉक्टर गदगदले
डॉ. स्नेहिल मिश्रा
Follow us
| Updated on: Apr 20, 2021 | 3:55 PM

मुंबई : कोव्हिड संसर्गाच्या काळात रेमडेसिव्हिर इंजेक्शन, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर यासारख्या आरोग्य सुविधांची तूट असल्याच्या बातम्या देशाच्या कानाकोपऱ्यातून येत आहेत. एकीकडे असहाय्य रुग्णांचे गैरफायदा घेणारे, मृतांच्या टाळूवरील लोणी खाणारी प्रवृत्ती दिसते, तर दुसरीकडे माणुसकीचा वाहणारा झराही दर्शन घडवतोय. मुंबईतील एका प्रसिद्ध डॉक्टरांनाही प्रतिकूल परिस्थितीतील ‘देणाऱ्या हातांचं’ दर्शन घडलं. गरीब कोरोनाग्रस्तांसाठी माझा पगार घ्या, या भाजीवाल्याच्या मुलाने पाठवलेल्या व्हॉट्सअॅप मेसेजमुळे डॉक्टरही गदगदले. (Mumbai Doctor shares message of Vegetable Vendor Son to help COVID affected poor family)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना आरोग्य सुविधांसाठी झगडावं लागत आहे. यासाठी दात्यांनी पुढे येऊन गरजूंसाठी आर्थिक हातभार लावावा, असं आवाहन वारंवार केलं जातं. अशा प्रसंगात कोणी पैशांची मदत करत आहे, कोणी कोव्हिड हॉस्पिटलसाठी जागा उपलब्ध करुन देत आहे, कोणी घरचा सकस आहार कोरोनाग्रस्त रुग्णांना पुरवत आहे, कोणी कठीण काळात मानसिक पाठिंबा देत आहे, तर कोणी दुःखद प्रसंगात अंत्यसंस्कारासाठी हातभार लावत आहे. कुठल्याही स्वरुपातील मदत छोटी नसते, हे वेळोवेळी अधोरेखित होत आहे.

डॉ. स्नेहिल मिश्रा यांचे ट्विट

मुंबईतील खार भागातील हिंदुजा रुग्णालयातील कार्डिओलॉजिस्ट डॉ. स्नेहिल मिश्रा यांनी नुकताच ट्विटरवर एक मेसेज शेअर केला. आपल्या भाजीवाल्याच्या मुलाने पाठवलेल्या व्हॉट्सअॅप मेसेजचा स्क्रीनशॉट त्यांनी ट्वीट केला आहे. “माझा रुग्ण भाजी विक्रेता आहे. हा मेसेज त्याच्या मुलाने पाठवला आहे. माझ्याकडे शब्द अपुरे पडले, हे खरे हिरो आहेत” असं मिश्रांनी लिहिलं आहे.

काय आहे मेसेज?

“हाय सर, हॉस्पिटल व्हेंटिलेटर किंवा औषधांचा खर्च भागवू न शकणारे एखादे कोरोनाग्रस्त गरीब कुटुंब आहे का? असल्यास मला कळवा, मला माझा पगार देऊन त्यांचा जीव वाचवायचा आहे” असा भारावणारा मेसेज पाठवला. चेहरा नसलेल्या अशा नायकांचं फारसं कौतुक होत नाही. त्यामुळेच डॉ. स्नेहिल मिश्रा यांनी आवर्जून हा मेसेज सोशल मीडियावर शेअर करत इतरांनाही प्रेरणा दिली. हे ट्वीट प्रचंड व्हायरल झालं असून नेटिझन्सनीही त्याला दाद दिली आहे. अनेक जणांनी त्याच्या पावलावर पाऊल टाकत गरीब कोरोना रुग्णांना मदत करण्याची तयारीही दर्शवली आहे. (Mumbai Doctor message of Vegetable Vendor Son)

संबंधित बातम्या :

Video : अंध आईच्या हातातला मुलगा चालता चालता रेल्वे ट्रॅकवर पडला आणि तेवढ्यात रेल्वे आली

अपघातग्रस्त कारच्या मदतीला थांबलेल्या मर्सिडीजला धडक, दोघा देवदूतांचा मृत्यू, नगरसेवक सुखरुप

(Mumbai Doctor shares message of Vegetable Vendor Son to help COVID affected poor family)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.