
भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत उपयुक्त आणि डिजिटल पायरी उचलली आहे. आता शेतकऱ्यांना आपल्या भाषेतच त्यांच्या अडचणींचं समाधान मिळणार आहे. केंद्र सरकारने ‘किसान-E-मित्र’ नावाचा एक स्मार्ट आणि AI आधारित चॅटबॉट लाँच केला आहे, जो PM किसान सन्मान निधी योजनाअंतर्गत सुरू करण्यात आला आहे. या चॅटबॉटचा उद्देश शेतकऱ्यांच्या समस्यांना तत्काळ आणि अचूक उत्तरं देणं आहे.
‘किसान-E-मित्र’ हा एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित चॅटबॉट आहे जो मोबाईल आणि व्हॉट्सअॅपद्वारे 2447 उपलब्ध आहे. म्हणजे, कोणत्याही वेळी शेतकरी आपल्या मोबाईलवरून प्रश्न विचारू शकतात आणि लगेचच या चॅटबॉटकडून सोप्या भाषेत उत्तरं मिळवू शकतात.
1. PM किसान योजना संबंधित माहिती
2. हवामान अहवाल
3. पीक विमा योजना
4. ई-केवायसी अपडेट्स
5. इतर कृषी संबंधित बाबी
शेतकऱ्यांना फक्त व्हॉट्सअॅप नंबर 99915 22222 वर “हाय” किंवा आपला प्रश्न पाठवायचा आहे. हा चॅटबॉट लगेचच टेक्स्ट किंवा व्हॉइस स्वरूपात उत्तर देतो. हे संपूर्ण तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) विकसित केलं आहे.
किसान-E-मित्र चॅटबॉट 11 भारतीय भाषांमध्ये काम करतो ज्यामध्ये हिंदी, मराठी, तमिळ, बंगाली यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, हा चॅटबॉट भाषेतील किंवा स्पेलिंगमधील लहान चुका देखील समजून घेतो आणि तरीही योग्य उत्तर देतो.
रिपोर्ट्सनुसार, हा चॅटबॉट दररोज सुमारे 25,000 प्रश्नांची उत्तरे देत आहे, आणि आतापर्यंत 10 लाखांहून अधिक प्रश्नांची उत्तरं देण्यात यशस्वी झाला आहे.
‘किसान-E-मित्र’ केवळ शेतीपुरताच मर्यादित नाही, तर सरकार लवकरच आरोग्यसेवा, स्मार्ट सिटी, शिक्षण अशा अनेक क्षेत्रातही AI आधारित तंत्रज्ञानाचा उपयोग करणार आहे. यामुळे नागरिकांना जलद, अचूक आणि सुलभ सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
‘किसान-E-मित्र’ ही शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल साथी प्रमाणे कार्य करत आहे. पूर्वी जिथे सरकारी योजनांची माहिती मिळवणं कठीण होतं, तिथे आता शेतकरी आपल्या भाषेत आणि सहज मोबाईलवरून ही माहिती घेऊ शकतात.