AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साखरपुड्यात अंगठीची शानदार एंट्री!

अनेक नियोजन हे वेगळ्या स्तराचे असते. त्याचे व्हिडिओ जेव्हा इंटरनेटवर येतात, तेव्हा लोकांना ते खूप आवडतात. सध्या असाच एक व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेत आहे.

साखरपुड्यात अंगठीची शानदार एंट्री!
Ring entry in ring ceremonyImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jan 21, 2023 | 3:23 PM
Share

सध्या सोशल मीडियावर लग्नाचे व्हिडिओ ट्रेंड करत आहेत, ज्यात नवरदेवाची डान्स एन्ट्री, फॅमिली डान्स आदींचा समावेश आहे. वधू-वरांसोबतच त्यांचे कुटुंबीय आणि मित्रमंडळीही या खास दिवसासाठी खूप उत्सुक असतात आणि ते जोरदार प्लॅनिंग करतात. पण अनेक नियोजन हे वेगळ्या स्तराचे असते. त्याचे व्हिडिओ जेव्हा इंटरनेटवर येतात, तेव्हा लोकांना ते खूप आवडतात. सध्या असाच एक व्हिडिओ लोकांमध्ये चर्चेत आहे.

तसं पाहिलं तर आजच्या काळात तंत्रज्ञानाने आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं आहे. उदाहरणार्थ, कोणी वरमाला ड्रोन आणले तर कोणी स्वत: जेसीबीमधून येऊन लोकांना आश्चर्यचकित करते. पण आजकाल साखरपुड्याच्या अंगठीच्या ग्रँड एन्ट्रीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका साखरपुड्याच्या समारंभातील असल्याचे दिसत आहे. त्यात एक मोठी अंगठी आहे, मुलगा आणि मुलगी आपापल्या परीने चालत आहेत. या मोठ्या अंगठीच्या वर एक झाकण असून त्यात लग्नाच्या दोन अंगठ्या आहेत. व्हिडिओ बारकाईने पाहिला तर लक्षात येईल की रिमोटने चालणाऱ्या व्हील कार्टवर मोठी अंगठी ठेवली आहे आणि मोठी अंगठी स्टेजवर येताच आणि जवळ येताच वधू-वर आपली अंगठी उचलून एकमेकांना घालतात.

हा व्हिडिओ मुंबईचे सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून 63 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाइक केले आहे. यावर आता लोक वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिलं आहे. “ही फक्त नौटंकी आहे, रिंग इव्हेंटसाठी पैसे खर्च केले पण महिलांना खुर्च्यांवर बसवू शकला नाही… “

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं