Video | मित्र येताच नवरदेव खुलला, भर मंडपात नागिन डान्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 09, 2021 | 8:32 AM

सध्या एका लग्न समारंभातील व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांमध्ये एकच हशा पिकला आहे.

Video | मित्र येताच नवरदेव खुलला, भर मंडपात नागिन डान्स, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
marriage nagin dance

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय मजेदार असतात. सध्या एका लग्न समारंभातील व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांमध्ये एकच हशा पिकला आहे. (groom performing nagin dance in front of people video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

लग्न सोहळ्यातील व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडतात. नवरी तसेच नवरदेवाने केलेली धम्माल या व्हिडीओंमध्ये दाखवलेली असते. तर काही व्हिडीओंमध्ये वऱ्हाडी तसेच नवरी-नवरदेवाच्या मित्रांनी केलेल्या करामती दाखवण्यात आलेल्या असतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नवरदेवाच्या एका मित्राने जबरदस्त डान्स केला आहे. हा नागिन डान्स पाहून नेटकरी हसून हसून लोटपोट झाले आहेत.

मित्राचा नवरी-नवरदेवासमोर नागिन डान्स

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नवरदेवाचा एक मित्र जोरदार डान्स करत आहे. तो थेट स्टेजवर आला आहे. स्टेजवर येऊन त्याने नवरी नवरदेवासमोर लोळण घेतली आहे. तसेच हात वर करत तो नागिन डान्स करत आहे. विशेष म्हणजे मित्र नागिन डान्स करत असल्याचे पाहून नवरदेवाला कन्ट्रोल झालेले नाही. तोसुद्धा आपल्या मित्रासोबत नागिन डान्स करायला लागला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. लोक हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला official_niranjanm87 या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

VIDEO | अभ्यास सोडून छोटी मुलगी इन्स्टाग्राम रिल्स करण्यात मग्न, आईने शिकवला चांगलाच धडा, व्हिडीओ पाहाच

Video | वरात घेऊन येताच मेहुण्यांनी दिलं ‘हे’ सरप्राईज, नवरदेवही झाला खूश, व्हिडीओ एकदा पाहाच

Video | माशाला पकडण्यासाठी पक्ष्याची नामी युक्ती, ब्रेडच्या मदतीने शिकार नेमकी कशी केली ? व्हिडीओ पाहाच

(groom performing nagin dance in front of people video went viral on social media)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI