AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | 8 वर्षांचा आंदोलक, पत्रकारांच्या प्रश्नांना धाडधाड देतो उत्तर, म्हणतो मला पंतप्रधान व्हायचंय, पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ पाहून नेटकरी दंग झाले आहेत. या व्हिडीओमध्ये एक आठ वर्षाचा मुलगा दिसत असून तो दिल्लीमध्ये कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहे.

Video | 8 वर्षांचा आंदोलक, पत्रकारांच्या प्रश्नांना धाडधाड देतो उत्तर, म्हणतो मला पंतप्रधान व्हायचंय, पाहा व्हिडीओ
| Edited By: | Updated on: Aug 08, 2021 | 12:10 AM
Share

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांचे व्हिडीओ तर मोठ्या चवीने पाहिले जातात. लहान मुलांचे लडीवाळ व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा मूड फ्रेश होतो. सध्या एक वेगळाच व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी दंग झाले आहेत. या व्हिडीओमध्ये एक आठ वर्षाचा मुलगा दिसत असून तो दिल्लीमध्ये कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहे. (eight year old angad singh criticizes narendra modi and support farmers protest at delhi giving answer to journalist)

छोटा मुलगा मोदी सरकारवर टीका करतोय

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अंगद सिंग नावाचा एक आठ वर्षांचा मुलगा दिसत आहे. हा मुलगा अतिशय चलाख असून त्याची राजकीय परिपक्वता वाखाणण्याजोगी आहे. शेतकऱ्यांच्या कृषी कायद्यांविरोधातील दिल्ली येथील आंदोलनाला त्याचा पाठिंबा आहे. तो मोदी सरकारवर जोरदार टीका करतोय. त्याच्या भोवती पत्रकारांनी गर्दी केली असून ते आठ वर्षाच्या या आंदोलकाला अनेक प्रश्न विचारत आहे. विशेष म्हणजे पत्रकार प्रश्नांचा भडीमार करत असले तरी तो विचलित न होता सर्व प्रश्नांची उत्तरं देत आहे.

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पत्रकार आठ वर्षाच्या अंगद सिंगला अनेक प्रश्न विचारत आहेत. त्या सर्वांच्या प्रश्नांना उत्तरं देताना तो भाजपला सोडून कोणालाही मतदान करा असे आवाहन करत आहे. तसेच आम्ही सुजानगढ, पश्चिम बंगालला गेलो होतो. येथे भाजपची हार झाली. आता उत्तर प्रदेशमध्येदेखील असेच होणार आहे, असा दावा हा छोटा मुलगा करताना दिसतो.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, या आठ वर्षीय मुलाचा हा व्हिडीओ नेटकरी मोठ्या आवडीने पाहत आहेत. त्याच्या मनात असलेली निडरता तसेच त्याची धडाकेबाज वृत्ती सर्वांनाच आवडली आहे. विशेष म्हणजे मोठं होऊन तो पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहत आहे. नेटकरी या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर आणि लाईक करत आहेत. हा व्हिडीओ THE MITHILA या यूट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आलेला आहे.

इतर बातम्या :

Video | हळदी समारंभात धम्माल, महिलांसोबत काकांचा मजेदार डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच

Video | लखनऊ नंतर ‘पानिपत गर्ल’चा कारनामा, कारचालकाला भररस्त्यात मारहाण, व्हिडीओ व्हायरल

Video : नवऱ्याच्या मित्राने दिलेलं गिफ्ट उघडताच नवरी लाजली; नेमकं काय घडलं पाहाच!

(eight year old angad singh criticizes narendra modi and support farmers protest at delhi giving answer to journalist)

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.