AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्योगपती हर्ष गोयंकांनी हा फोटो पाहून सॅल्युट केला, काय आहे हा फोटो?

प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी शेअर केलेला हा फोटो प्रत्येकाने बघावा असाच आहे. (harsh goenka women carrying lamp child)

उद्योगपती हर्ष गोयंकांनी हा फोटो पाहून सॅल्युट केला, काय आहे हा फोटो?
| Updated on: Mar 21, 2021 | 11:54 PM
Share

मुंबई : मानवी जीनव अनेक चढउतारांनी भरलेलं आहे. वेगवेगळ्या निकषांवर माणसाचे जण्याचे विविध पैलू आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येकाला या जागात फक्त आपणच दबलेले, पिचलेले आहोत असं वाटतं. तसेच या जगात फक्त आपणच अतोनात कष्ट करत आहोत असंही कधी आपल्याला सहज वाटतं. या विचाराने काही क्षणासाठी आपण दुखावतोसुद्धा. पण अशी भावना मनात आल्यानंतर प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंकांनी शेअर केलेला हा फोटो प्रत्येकाने बघावा असाच आहे. छोट्याशा बाळाला झोळीमध्ये टाकून जगण्यासाठी संघर्ष करणारी ही माऊली आपल्याला बरंच काही शिकवून जाईल. हर्ष गोयंका यांनीसुद्धा या मातेला सॅल्युट केला आहे. (Harsh Goenka tweet photo of women carrying battery electric lamp with her child)

फोटोमध्ये नेमकं काय आहे?

हर्ष गोयंका हे प्रसिद्ध उद्योगपती आहे. दिवसभर कामात व्यस्त असूनसुद्धा ते सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांनी आज त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक हृदयस्पर्शी, प्रेरणादायी फोटो ट्विट केला आहे. गोयंका यांनी हा फोटो ट्विट करताच सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उटमल्या आहेत. कित्येकांनी हा फोटो अगदीच प्रेरणादायक असल्याचं म्हटलंय. या फोटोमध्ये नवरा मुलगा एका शानदार घोड्यावर बसला आहे. नवरदेवासोबत एक छोटीशी गोंडस मुलगी बसली आहे. डोक्यावर भरदार फेटा बांधून नवरा मुलगा त्याच्या वरातीत ऐटीत बसला आहे. मात्र, या नवरदेवाच्या मागे डोक्यावर इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणारा मोठा दिवा घेऊन एक महिला उभी आहे. ही महिला संघर्षाची आणि मेहनतीची जाणीव करुन देतेय. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महिलेच्या डोक्यावर दिवा तर आहेच पण तिच्या झोळीमध्ये तिचं तान्हं मुलसुद्धा आहे. ती महिला आपल्या लहान मुलाला घेऊन डोक्यावर कित्येक किलोंचं ओझं घेऊन जगण्यासाठी संघर्ष करताना दिसतेय.

harsh goenka women carrying lamp child

हर्ष गोयंका यांनी हाच फोटो ट्विट केला आहे.

गोयंका यांचा महिलेला सॅल्युट

हाच फोटो गोयंका यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करत या महिलेला सॅल्युट केला आहे. “कधीकधी मी खूप काम केल्यासारखं मला वाटतं. पण मी हा फोटो पाहिला. या महिलेला माझा सॅल्युट,” असं गोयंका यांनी कॅप्शनमध्ये लिहलंय.

गोयंका यांच्या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया

गोयंका यांनी हा फोटो ट्विट केल्यानंतर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींना हा फोटो खरंच प्रेरणादायी असल्याचं म्हटलंय. तर काहींना हा फोटो पाहून दु:ख व्यक्त केलंय. ही आपल्या देशातील सामाजिक दरी असल्याचं काहींनी म्हटलं आहे.

दरम्यान, गोयंका यांनी हा फोटो ट्विट करताच. अनकेांनी या फोटोला वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. संवेदना जागवणारा हा फोटो असल्यामुळे तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे

इतर बातम्या :

Video | कोरोना लस घेतल्यानंतर आनंद कसा होतो पाहायचंय?, मग हा मजेदार व्हिडीओ नक्की पाहा

(Harsh Goenka tweet photo of women carrying battery electric lamp with her child)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.