AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिल्लाला वाचविण्यासाठी आईने दिली आहुती, ते दृश्य पाहून लोकही हळहळले

सोशल मिडीयावर अनेकदा काही भावानिक व्हिडीओ देखील व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.

पिल्लाला वाचविण्यासाठी आईने दिली आहुती, ते दृश्य पाहून लोकही हळहळले
deer newsImage Credit source: socialmedia
| Updated on: Aug 14, 2023 | 2:24 PM
Share

मुंबई | 13 ऑगस्ट 2023 : जगात सर्वात जास्त कोणीही आपल्या आईवरच प्रेम करीत असते. आई आपल्या बाळाच्या रक्षणासाठी जगातल्या कोणत्याही संकटास सामोरे जाण्यास तयार असते. मनुष्यप्राणीच नाही तर प्राण्यांमध्ये आई आणि तिच्या पिल्लाचे नाते काही वेगळच असते. आई आपल्या पिल्लांच्या रक्षणासाठी प्रसंगी स्वत:चे बलिदान देण्यास एका पायावर तयार होते. असाच एक आई आणि तिच्या पिल्लाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असून तो पाहून लोक भावूक होत आहेत.

सोशल मिडीयावर अनेकदा काही भावानिक व्हिडीओ व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. यात एक हरीणाचे पिल्लू पाण्याचा तलाव पोहून पार करताना दिसत आहे. तलावाच्या मध्यभागी आल्यावर अचानक त्याच्या दिशेने एक मगर झेपावते.

हरीणाच्या पिल्लाजवळ ती मगर चालून येते. वेगाने आपल्या पिल्लाकडे येत असलेल्या मगरीला पाहून त्या हरीणाच्या पिल्लाची आई त्वेषाने पोहत सर्व शक्ती एकटवून पिल्लाजवळ वेगाने पोहत येते.

पिल्लू आणि मगरीच्या मध्ये ढाल बनून ती हरीणी पाण्यात स्तब्ध उभी राहाते. पिल्लाला आपले लक्ष्य साध्य करताना आलेला मगररुपी अडथळा पाहून ती हरीण स्वत:चे आयुष्यपणाला लावते. ही आई हरीण स्वत: मगरीच्या तोंडचा घास होते. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ पाहणारे आईचा त्याग पाहून चांगलेच हळहळत आहेत.

येथे पाहा व्हिडीओ –

View this post on Instagram

A post shared by Horrors (@horrors)

लोक झाले भावूक

या व्हिडीओला इंस्टाग्रामच्या @horrors नावाच्या पेजवर शेअर केला आहे. या व्हिडीओला पोस्ट करताना कॅप्शन लिहीण्यात आली आहे. एक हरीण आपल्या पिल्लाला वाचविण्यासाठी स्वत: मगरीचे भक्ष्य बनली. या व्हिडीओला लाखो लोकांनी लाईक्स केले आहे. या व्हिडीओवर लोकांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की हा व्हिडीओ दु:खद आहे. दुसऱ्या युजरने म्हटले आहे की या व्हिडीओचा शेवट पाहून माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहीले. एकाने लिहीले आईने थांबून क्षणभर आपल्या मुलाला सुरक्षित दूर जाताना पाहीले.

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.