प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये एवढा खाणेरडा प्रकार; एका ग्राहकाच्या ताटातील उरलेला कांदा,चटणी दुसऱ्या ग्राहकाला, व्हिडीओ व्हायरल
सध्या एका संतप्त प्रसिद्ध रेस्टॉरंटचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रेस्टॉरंटमध्ये चक्क एका ग्राहकाच्या ताटात उरलेला कांदा आणि चटणी नवीन म्हणून दुसऱ्या एका ग्राहकाला देण्यात आल्याचा घाणेरडा प्रकार उघडकीस आला आहे.

आपण जेव्हा रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो तेव्हा आपण पहिल्यांदा पाहतो ते तिथली स्वच्छता आणि मग जेवणाची चव. पण जर तुम्हाला समजलं की तुम्हाला दुसऱ्या एखाद्या ग्राहकाच्या ताटातला उरलेल्या कांदा, लिंबू दिला आहे तर नक्कीच धक्का बसेल. असाच काहीसा प्रकार घडला एका रेस्टॉरंटमध्ये. या रेस्टॉरंटमध्ये जेवण झाल्यानंतर प्लेटमध्ये उरलेला कांदा दुसऱ्या एका ग्राहकाला सर्व्ह केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
एका ग्राहकाच्या ताटातील कांदा,चटणी दुसऱ्या ग्राहकाला
हैदराबादमधील एका रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार घडला असून याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी जेवण झाल्यानंतर उरलेला कांदा फेकून देत असल्याचं सागितलं.
मात्र, त्यानंतर हॉटेलच्या मॅनेजरने हाच कांदा परत ग्राहकांना दिला जात असल्याची कबुली दिली आहे. हा व्हिडीओ बघून अनेकांना धक्का बसला आहे.
स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचंही उल्लंघन
संबंधित रेस्टॉरंटमध्ये स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचंही उल्लंघन होत असल्याचंही या व्हिडीओतून समोर आलं आहे. या व्हिडीओमध्ये रेस्टॉरंटचे किचन आणि भांडी धुण्याची जागाही दाखवण्यात आली आहे. या ठिकाणी प्रचंड अस्वच्छता दिसून येत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.
View this post on Instagram
भारतातल्या मोठ्या रेस्टॉरंटपैकी असलेलं हे रेस्टॉरंट
हा व्हिडीओ हैदराबादमधील अमृतसर हवेलीमधला असल्याची माहिती मिळत आहे. व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की अमृतसर हवेली, हे भारतातल्या 25 मोठ्या रेस्टॉरंटपैकी एक आहे. यावेळी त्याने रेस्टॉरंटमधील एका एका ग्राहकाची उरलेला कांदा आणि चटणी दाखवली आहे. हा कांदा ग्राहकांना परत देण्यात येत असल्याचा आरोप त्याने केला आहे.
संतप्त प्रतिक्रिया
हा व्हिडीओ @foodsafetywar या इंस्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. या विरोधात आपल्याला आवाज उठवावा लागेल, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना स्ट्रीट फूड रेस्टॉरंटमधल्या जेवणापेक्षा कित्येक पटीने चांगल असल्याचं एकाचं म्हटलं आहे. तर अन्य एकाने बाहेर जेवण करणं बंदच करा, असा सल्लाही दिला आहे. केली आहे. अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रियाही दिली आहे.
दरम्यान सर्वत्र नावाजलेल्या रेस्टॉरंटमध्येच अशी परिस्थिती असेल तर कुटुंबासोबत कोणत्या विश्वासावर आपण रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचं असा प्रश्न उपस्थित होतं आहे.तसेच असे प्रकार घडू नये यासाठी कडक कारवाई होणे गरजेचं आहे.
