AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पाचवीतील मुलीला अधिकारी कसं बनवायचं?’, पालकाचं आयएएस अधिकाऱ्याला पत्र, सोशल मीडियावर चर्चाच चर्चा

एका पालकाने आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एका आयएएस अधिकाऱ्याला पत्र लिहिलं आहे. त्याचं हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने ट्विटरवर ट्विट करून आयएएस अधिकाऱ्याला पाल्याच्या भविष्या बाबत सवाल विचारला आहे.

'पाचवीतील मुलीला अधिकारी कसं बनवायचं?', पालकाचं आयएएस अधिकाऱ्याला पत्र, सोशल मीडियावर चर्चाच चर्चा
अवनीश शरण
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Jun 02, 2022 | 7:10 PM
Share

मुंबई : आपल्या पाल्याला चांगलं शिक्षण मिळावं, त्याने चांगल्या ठिकाणी नोकरी करावी, वान कमावावं, असं प्रत्यक पालकाचं हे स्वप्न असतं. त्याने अधिकारी व्हावं, अशी अनेक पालकांची इच्छा असते. त्यासाठी ते वेगवेगळ प्रयत्न करत असतात. एका पालकाने आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एका आयएएस (IAS) अधिकाऱ्याला पत्र लिहिलं आहे. त्याचं हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Latter) होत आहे.

व्हायरल पत्र

एका पालकाने आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एका आयएएस अधिकाऱ्याला पत्र लिहिलं आहे. त्याचं हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने ट्विटरवर ट्विट करून आयएएस अधिकाऱ्याला पाल्याच्या भविष्या बाबत सवाल विचारला आहे. “जर तुम्हाला तुमच्या पाल्याला आयएएस बनवायचे असेल तर त्यासाठी काय करावं लागेल?, असं या व्यक्तीने विचारलं आहे. ‘माझी मुलगी पाचवीत शिकते आणि मला तिला आयएएस अधिकारी बनवायचं आहे. मला सांगा की मी तिला कसे शिक्षण द्यावं, जेणेकरून त्याला IAS अधिकारी बनण्यात यश मिळेल. कृपया मला काही मार्गदर्शन करा’, असं या व्यक्तीने आयएएस अधिकारी अवनीश शरण यांना विचारलं आहे. त्याचं हे पत्र अवनीश शरण यांनी ट्विट केलं आहे. हे पत्र सध्या व्हायरल होत आहे.  यावर अवनीश यांनी “मी यावर काय उत्तर देऊ?’, असं म्हटलंय.

अवनीश शरण यांचे ट्विट व्हायरल होत असतात. याआधीही त्यांचं एक ट्विट व्हायरल झालं होतं. या व्हायरल ट्विटवर नेटकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आयएएस अवनीश शरण यांनी केलं आहे. पहिल्या पगाराचा संदर्भ देत त्यांनी हे ट्विट केलंय. “तुम्ही तुमच्या पहिल्या पगाराचं काय केलं किंवा करणार आहात?”, त्यावर नेटकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपले अनुभव सांगितले आहेत.अवनीश शरण यांच्या ट्विटवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.एकाने लिहिलंय की मी माझा पहिला पगार माझ्या आई-वडिलांना समर्पित करेल. तर काहींनी सांगितलंय की गरजूंना मदत करेल.

Follow Us
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा, ज्ञानेश कुमार...
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
मतदारांच्या हक्कांसाठी SIR का महत्त्वाचं? CM फडणवीसांनी दिली माहिती
मतदारांच्या हक्कांसाठी SIR का महत्त्वाचं? CM फडणवीसांनी ट्विट करत दिली मोठी अपडेट
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर...
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर घणाघात; थेट म्हणाले...
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्य
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना नोटिसा
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे...
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे नियम काय?
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही;
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही; पक्षाने मांडली स्पष्ट भूमिका
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही...
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही आलं समोर
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी...
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्ध्यातच थांबवलं भाषण, नेमकं काय घडलं?
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महा
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महामोर्चा, जय्यत तयारी