AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar IIT Village: आयआयटी व्हिलेज! या गावात सगळेच रँचो आहेत, आल इज वेल म्हणत सहज IIT पास होतात

IIT Village: ही परीक्षा प्रत्येक जण पास होऊ शकत नाही. त्यासाठी मुलं फार मेहनत घेऊन पूर्वतयारी करतात, मग कुठेतरी त्यांना ही परीक्षा उत्तीर्ण होता येते.

Bihar IIT Village: आयआयटी व्हिलेज! या गावात सगळेच रँचो आहेत, आल इज वेल म्हणत सहज IIT पास होतात
IIT Village BiharImage Credit source: Social Media
| Updated on: Jul 16, 2022 | 12:09 PM
Share

Bihar IIT Village: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (IIT) शिक्षण घेणे हे जवळजवळ प्रत्येक मुलाचे स्वप्न असते. देशातील एका अत्यंत प्रतिष्ठेच्या संस्थेत प्रवेश मिळवली तर नोकरी सुद्धा तितकीच चांगली मिळते असं मानलं जातं. असं होतं सुद्धा…कारण शेवटी ते आयआयटी आहे. पण आयआयटीमध्ये प्रवेश (IIT Entrance) मिळवणं अवघड असतं,परीक्षा खूप कठीण असते. ही परीक्षा प्रत्येक जण पास होऊ शकत नाही. त्यासाठी मुलं फार मेहनत घेऊन पूर्वतयारी करतात, मग कुठेतरी त्यांना ही परीक्षा उत्तीर्ण होता येते. हे तर झालं इतर मुलांचं! पण भारतात बिहारमध्ये (Bihar Village) एक गाव आहे, जिथे प्रत्येक घरातील मुलं आयआयटीमध्ये निवडली जातात. रिपोर्ट्सनुसार, 1996 पासून हा ट्रेंड सुरू आहे.

कोचिंगशिवाय तयारी

बिहारच्या गया जिल्ह्यातील पटवतोली गाव हे आयआयटीयन्सचं गाव म्हणून ओळखलं जातं. दरवर्षी या गावातील सुमारे डझनभर मुलं आयआयटीची स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होतात आणि त्यांना देशातील या प्रतिष्ठित संस्थेत शिकण्याची संधी मिळते. माहितीनुसार, ही मुलं कोचिंगच्या मदतीशिवाय या परीक्षेत पास होतात.

आयआयटीच्या वरिष्ठांची मदत

गावच्याच लायब्ररीच्या मदतीने मुलं तयारी करतात. हे ग्रंथालय येथील तरुण चालवतात, त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. त्याचबरोबर येथील आयआयटीमध्ये शिकलेले किंवा शिकत असलेले लोकही आपल्या गावातील या मुलांना ऑनलाइन क्लासेसच्या माध्यमातून शिकवतात. आयआयटीमध्ये शिकणाऱ्या मुलांची मदत मिळाल्यानंतर आयआयटीची परीक्षा देणं इथल्या मुलांना थोडं सोपं जातं. आयआयटीच्या प्रवेश परीक्षेत येथील मुले दरवर्षी चांगली कामगिरी करतात आणि अनेक मुलांची निवडही होते, त्यामुळे या गावाला ‘आयआयटी व्हिलेज’ असेही म्हणतात, हे जाणून घेऊया.

महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले
महाराष्ट्र हिरवा करण्याची कुणाची हिंमत नाही; मोहोळ स्पष्टच बोलले.
मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर
मलाड रेल्वे स्थानकातील हत्या प्रकरणाचा नवा CCTV समोर.
मालाड रेल्वेस्थानक हत्या प्रकरण; आरोपीला अटक, काय होणार शिक्षा?
मालाड रेल्वेस्थानक हत्या प्रकरण; आरोपीला अटक, काय होणार शिक्षा?.
डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?
डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?.
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर.
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक.
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.