बाल्कनीतून पैशांचा पाऊस… रजई धुवून बाल्कनीत वाळायला घालताच डॉलरची बरसात

Mysterious rain of money : चीनमधील एका परिसरात पहाटे अचानक झालेल्या डॉलरच्या पावसाने सर्वांनाच धक्का दिला, पण सत्य समोर आल्यावर लोकांना आणखी धक्का बसला. हे प्रकरण खूपच रंजक आहे.

बाल्कनीतून पैशांचा पाऊस... रजई धुवून बाल्कनीत वाळायला घालताच डॉलरची बरसात
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 4:28 PM

बीजिंग : आपली कमाई स्वत:च्या हाताने घालवली, असं काही तुम्ही ऐकलं असेल. पण असं खरोखर घडलेलं तुम्ही पाहिलं आहे का ? पण हे चीनमध्‍ये (china) घडलं आहे. एका व्यक्तीने मेहनतीने कमावलेला पैसा (money) त्‍याच्‍या बायकोने केवळ उधळला नाही, तर त्यासोबत झालेले नाट्यही सर्वांनीच पाहिले. आणि त्याची मजाही घेतली.

आणखी एक गोष्ट, सकाळी उठल्या उठल्या तुमच्या वर नोटांचा किंवा पैशांचा पाऊस पडला तर तुम्हाला कसं वाटेल ? चीनमध्ये नुकताच असा पाऊस पडला होता. खरंतर झालं असं की, चीनच्या अनहुई प्रांतातील एक महिला आपले घर साफ करत होती… आणि साफसफाई करताना तिने तिची रजाई उचलली आणि ती धुवून बाल्कनीत वाळत टाकायला गेली. मात्र ती कठड्यावर टाकण्यापूर्वी तिने रजई झटकली असता अचानक त्यातून नोटा बाहेर पडल्या आणि रस्त्यावर पैशांचा पाऊस पडायला लागला. हे पाहून त्या परिसरातील सर्व नागरिकांची नोटा गोळा करण्यासाठी एकच झुंबड उडाली. त्या महिलेच्याही हा प्रकार लक्षात आला, पण तोपर्यंत निम्मे पैसे बाहेर पडले होते.

बघता बघता काही वेळातच हे दृश्य संपूर्ण परिसरात पसरले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडीओ संपूर्ण चीनमध्ये व्हायरल झाला. त्यानंतर शेजाऱ्यांनी हवेतून खाली येणाऱ्या नोटा जमा करून त्या महिलेला परत केल्या. पण अनेक नोटा हवेत उडून दूर कुठेतरी जंगलाच्या दिशेने गेल्या आणि काही नोटा तर झाडांवर, फाद्यांमध्ये आणि इमारतीच्या वरच्या भागात अडकल्या.

रजईत पैसे आले कुठून ? खुलासा झाल्यावर सर्वजण झाले हैराण

खरंतर त्या महिलेच्या पतीने रजईमध्ये काही नोटा, पैसे लपवले होते. मात्र त्याला हे माहीत नव्हतं की त्याच्या मेहनतीची कमाई त्याची बायकोच अशी हवेत उधळून लावेल. त्या महिलेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, त्या रजईत त्याने सुमारे 3 लाख 60 हजार रुपये ठेवले होते. पण त्याला जे परत मिळाले ते त्या रकमेच्या निम्म्यापेक्षाही कमी होते.

आता या प्रकरणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यावर लोकं आपापली वेगवेगळी मते देत आहेत.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.