साप चावला म्हणून थेट सापालाच जिवंत पकडून डॉक्टरांसमोर आणलं, डॉक्टरांचीही भांबेरी!

हॉस्पिटलमध्ये हा तरुण सॅक घेऊन इमर्जन्सी रुममध्ये डॉक्टरांसमोर उभा राहिला आणि त्यांना या अजगरने चावा घेतला असून त्याला चक्कर येत असल्याचे सांगू लागला.

साप चावला म्हणून थेट सापालाच जिवंत पकडून डॉक्टरांसमोर आणलं, डॉक्टरांचीही भांबेरी!
साप चावलेला तरुण

हरदोई, यूपी: शेतीत काम करत असताना अजगराने तरुणाला दंश केला, त्यानंतर संतापलेल्या तरुणाने अजगराला पकडून बॅगेत बंद केलं आणि जिवंत अजगर घेऊन तो रुग्णालयात पोहचला. त्यामुळे डॉक्टरांची एकच भांबेरी उडाली. उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील अरवाल भागातील श्रीमाऊ गावात ही घटना घडली. हॉस्पिटलमध्ये हा तरुण सॅक घेऊन इमर्जन्सी रुममध्ये डॉक्टरांसमोर उभा राहिला आणि त्यांना या अजगरने चावा घेतला असून त्याला चक्कर येत असल्याचे सांगू लागला. अजगरला गोणीत पाहून डॉक्टर आणि उपस्थित लोकांची तारांबळ उडाली आणि तिथं धावपळही झाली. त्यानंतर डॉक्टरांनी त्या तरुणावर उपचार सुरू केले. (In Hardoi, UP, a young man was bitten by a snake and then the young man caught the snake and brought it to the hospital)

शेतकाम करताना सर्पदंश

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीमाऊ गावातील गुलफाम हा शेती करतो. गुलफामने सांगितले की, सोमवारी संध्याकाळी ते खोलीतून पेंढ्या काढत होता. पेंढ्यात बसलेल्या अजगराने त्याला चावा घेतला. डॉक्टरांना दाखवण्यासाठी त्याने साप पकडून गोणीत बंद केला आणि साप चावल्याची माहिती वडील सज्जाद यांना दिली. कुटुंबीयांनी त्याला सीएचसीमध्ये नेले, तिथून डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात रेफर केलं. गोणीतील साप पाहण्यासाठी रुग्णालयात नातेवाईक व इतर लोकांची गर्दी झाली होती. आपत्कालीन कक्षात उपस्थित असलेले डॉ. अभिषेक गुप्ता यांनी सांगितले की, अजगरात कोणतेही विष नसतं. सध्या रुग्णाची प्रकृती ठीक आहे.

सर्पमित्राने सापाला पुन्हा जंगलात सोडलं

तिथे उपस्थित असलेले सर्प मित्र सारस यांनी सांगितले की, ते अनेक दिवसांपासून सापांचे रक्षण आणि जतन करण्याचे काम करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही ठिकाणी साप बाहेर पडला तर तो त्याला पकडून जंगलात किंवा निसर्ग अधिवासात सोडण्याचे काम करतो. कारण त्यांना अशा जीवांवर खूप प्रेम आहे. ज्यांना लोक मारतात, ते त्यांना वाचवण्याचे काम करतात. पीडितने रुग्णालयात आणलेला साप पिशवीत टाकून सारसने जंगलात सोडला. यासोबतच सापाबाबतही माहिती दिली.

हेही वाचा:

Video: डोक्यावर पुष्पवृष्टी अन् डोळ्यात पाणी, पोलीस अधिकाऱ्याच्या निरोपाचा असा व्हिडीओ तुम्ही पाहिला नसेल!

Video: तरुणीची ‘मगर’मिठी, त्यानंतर काय झालं पाहा, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ!

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI