मिसाईल हल्ल्याची भीती! अचानक मोबाइलवर आलेल्या अलर्टने नागरिकांमध्ये भीती, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
भारतात अनेक लोकांच्या मोबाईलवर अचानक आपत्कालीन संदेशचा मोठा गरज वाजत एक संदेश आला. जो ऐकून काही क्षणासाठी लोक प्रचंड घाबरले. आता याच संदेशाबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मीम्स व्हायरल होत आहेत.

देशभरातील अनेक नागरिकांच्या मोबाईल फोनवर अचानक मोठ्या आवाजासह इमरजन्सी अलर्ट आल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अनेकांना सुरुवातीला हा कोणता तरी गंभीर धोका असल्याचे वाटले. मात्र, नंतर स्पष्ट झाले की हा कोणताही आपत्कालीन प्रसंग नसून भारत सरकार कडून आपत्ती इशारा प्रणालीची चाचणी (टेस्टिंग) सुरू होती.
या अलर्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की, हा केवळ एक टेस्ट मेसेज आहे आणि नागरिकांनी घाबरण्याची किंवा कोणतीही प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. तरीही अचानक फोनमध्ये सायरनसारखा मोठा आवाज येऊन स्क्रीनवर इशारा दिसल्याने अनेक जण दचकले.
हा मेसेज सरकारच्या ‘सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टम’चा एक भाग आहे. भविष्यात भूकंप, पूर, चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी नागरिकांना तात्काळ सूचना देण्यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने एकाच वेळी लाखो मोबाईल फोनवर अलर्ट पाठवता येतो, अगदी नेटवर्क कमी असतानाही. त्यामुळे ही प्रणाली पारंपरिक एसएमएसपेक्षा अधिक वेगवान आणि प्रभावी मानली जाते.
देशभरात या प्रणालीची चाचणी घेण्यात आली असून अनेकांच्या मोबाईलवर इमरजन्सी अलर्ट किंवा एक्स्ट्रीमली सिव्हियर अशा स्वरूपाचे संदेश आले. यासोबतच मोठा अलार्म वाजल्याने लोकांचे लक्ष वेधले गेले.
सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियावर, विशेषत X (ट्विटर) आणि Instagram वर मीम्सचा अक्षरशः पाऊस पडला. अनेक युजर्सनी या अनुभवावर विनोदी प्रतिक्रिया दिल्या. काहींनी लिहिले की, फोन असा ओरडला जणू जगच संपणार आहे तर काहींनी सरकारनेच सकाळी उठवले अशी गंमतीशीर प्रतिक्रिया दिली. एका युजरने मी अलार्म लावायला विसरलो होतो पण सरकारने उठवले असे म्हणत विनोद केला. तर दुसऱ्याने इतका मोठा आवाज आला की फोन फुटेल असे वाटले असे म्हटले.
When the emergency alert goes on your phone the second time
Public : pic.twitter.com/jIFyYfSORo— SwatKat💃 (@swatic12) May 2, 2026
काहींनी या अनुभवाची तुलना शाळेतील फायर ड्रिलशी केली तर काहींनी क्षणभर वाटले आपण युद्धात आहोत अशी प्रतिक्रिया दिली. एका युजरने तर मी हॉरर चित्रपट पाहत होतो आणि अचानक हा अलर्ट आला, अक्षरशः भीती वाटली असे लिहिले.
Horror movie dekh raha tha aur achanak se ye Cell Broadcast alert aa gaya 😱🫨 pic.twitter.com/14O2LxChC3
— Atulya (@DesiMemesTweets) May 2, 2026
अनेकांनी सुरुवातीला घाबरून लगेच सोशल मीडियावर धाव घेतली आणि हा खरा इशारा आहे का याची खात्री करून घेतली. मात्र, माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हा अनुभव हलक्याफुलक्या अंदाजात घेत मीम्स शेअर करण्यास सुरुवात केली.
Naku Alert Msg raledu enti⚠️
Government of India lekkalo nenu lena 🚶🥲#Alert pic.twitter.com/vdgTpP5FF3
— 𝐌𝐫. 𝐏𝐫𝐢𝐧𝐜𝐞 👑 (@Okkadu_2) May 2, 2026
सरकारचा हा उपक्रम नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर सूचना मिळाव्यात, हा यामागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळे अशा प्रकारचे अलर्ट मिळाल्यास घाबरण्याची गरज नसून ते अनेकदा केवळ चाचणीचा भाग असू शकतात, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.