India Pakistan War Prediction : भारत की पाक, कुणाचे पारडे जड, किती दिवस चालणार युद्ध, जाणून घ्या ते भविष्य

India Pakistan War Prediction : भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. दोन्ही बाजूने एकमेकांवर ड्रोन आणि मिसाईलद्वारे हल्ले करण्यात आले आहे. युद्धाची खुमखुमी असलेल्या पाकिस्तानला आतापर्यंत मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. आता हे युद्ध किती दिवस सुरू राहिल याविषयीची ही भविष्यवाणी व्हायरल होत आहे.

India Pakistan War Prediction : भारत की पाक, कुणाचे पारडे जड, किती दिवस चालणार युद्ध, जाणून घ्या ते भविष्य
किती दिवस चालणार युद्ध, काय ते भविष्य
Image Credit source: गुगल
| Updated on: May 10, 2025 | 10:35 AM

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा कॅम्प उद्ध्वस्त केला. त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि मिसाईलचा हमास पॅटर्न वापरला. हे सर्व हल्ले परतावून लावण्यात आले आहे. जम्मूच्या सीमावर्ती भागात काही ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. पाकड्यांच्या गोळीबारात काही भारतीय मारल्या गेले. दोन्ही बाजूने एकमेकांवर ड्रोन आणि मिसाईलद्वारे हल्ले करण्यात आले आहे. युद्धाची खुमखुमी असलेल्या पाकिस्तानला आतापर्यंत मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. आता हे युद्ध किती दिवस सुरू राहिल याविषयीची ही भविष्यवाणी व्हायरल होत आहे.

युद्धाची अगोदरच केली होती भविष्यवाणी

29 एप्रिल 2025 रोजी पत्रकाराने दिल्लीतील मुख्य ज्योतिषी अजय भांबी यांना भारत पहलगाम हल्ल्याचा बदला घेईल का? त्यावर 45 दिवसांच्या आता भारत पाकिस्तानवर कारवाई करेल असे भाकीत त्यांनी केले होते. तर पत्रकारांनी हे युद्ध किती भयंकर असेल असे विचारले होते. तसेच हे युद्ध किती दिवस चालणार याविषयी सुद्धा प्रश्न करण्यात आला होता.

भांबी यांनी केलेली भविष्यवाणी सर्वांनाच धक्का देणारी ठरली. 7 मे 2025 रोजी दुपारी 12.50 वाजता दिल्लीत हे प्रश्नोत्तर सुरू होते. त्यावेळी ते म्हणाले की, सध्या दिल्लीत आपण बोलत आहोत. यावेळी सिंह लग्न आणि मेष नवांशचा उदय होत आहे. सप्तम भागात पाकिस्तान दिसतो. लग्न भाव हा भारताचा आहे. तर त्याचा स्वामी सूर्य हा उच्च राशीत भाग्य स्थानी बुध ग्रहासह होता. त्यामुळे युद्धाचे परिणाम भारताच्या बाजूने असतील असा दावा त्यांनी केला.

पाकिस्तानमध्ये जनताच उतरणार रस्त्यावर

पाकिस्तानचा स्वामी शनि हा अष्टम भावात आहे. तो राहूने पीडित आहे. शुक्र अष्टम भावात 9 डिग्री आहे. तर त्याच नीच मंगल 12 व्या भागात 14 डिग्रीत आहे. त्यामुळे शुक्र आणि मंगळ मध्ये एक घातक योग झाला आहे. या संयोगामुळे पाकिस्तान शांत बसणार नाही हे ग्रहस्थिती दर्शवत आहे.

भांबी यांच्या अंदाजानुसार, पाकिस्तान जितक्या ताकदीने या युद्धात उतरेल, त्याला त्याहून अधिक आर्थिक फटका बसेल. त्याची आर्थिक घडी बिघडेल. त्याला मोठा फटका बसेल. त्यामुळे महागाई वाढेल आणि जनतेत असंतोष वाढेल. युद्ध ताणल्या गेल्यास पाकिस्तानची जनता सरकारविरोधात आणि लष्कराविरोधात रस्त्यावर उतरेल असा दावा भांबी यांनी ग्रहस्थिती आधारे केला आहे. प्रश्न कुंडलीनुसार, पाकिस्तानी लष्कर कुरापती थांबवणार तर नाहीच पण भारतावर मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न करेल. तर भारतीय लष्कर सुद्धा मागे हटणार नाही. पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यात येईल. पाकिस्तानला मोठे नुकसान सहन करावे लागेल.

अजय भांबीचे ते भविष्य

अणूयुद्ध होईल का?

चंद्र कुंडलीत लग्न भावात 23 डिग्री आणि गुरू हा 28 डिग्रीवर आहे. त्यामुळे जगातील शक्तिशाली आणि बलाढ्य देश हे युद्ध भडकवू देणार नाहीत. पाकिस्तानचा कमकुवत पणा दिवसागणिक दिसून येईल. पाकिस्तान अणू युद्धाची तयारी करेल. पण अणू युद्ध होणार नाही असे भाकीत भांबी यांनी केले.

किती दिवस चालेल युद्ध?

ग्रहस्थिती ही पूर्णपणे भारताच्या बाजूने अनुकूल असल्याचे ग्रहमान सांगते. भारताच्या कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत आहे. भारत जेव्हा पाकिस्तानवर हल्ला करेल, तेव्हा जगातील बलाढ्य देश हे युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थीचा प्रयत्न करतील. अशा स्थितीत भारत, ही कारवाई थांबवण्याची आणि सामंजस्याची भूमिका घेईल. या हल्ल्याचा कालावधी हा 7 ते 27 दिवसांदरम्यान असेल. कुंडली नुसार हे युद्ध भयंकर नसेल. पण या युद्धाने पाकिस्तानला मोठा झटका बसेल. तो अनेक दिवस भारताविरोधात आगळीक करणार नाही, असा दावा भांबी यांनी ग्रहस्थितीवरून केला आहे.