AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाक आर्मीला जबरदस्त तडाखा, जिथून ड्रोन हल्ला करत होता पाकिस्तान, भारताने उडवले ते लाँच पॅड, Video पाहा

Pakistan Drone Launch Pad Brust : भारतीय सेनेने पाकिस्तानला जबरदस्त झटका दिला. जिथून पाकिस्तान भारतावर ड्रोन हल्ला करत होता. ते लाँच पॅड भारताने उद्ध्वस्त केले. जम्मू काश्मीर लगतच्या सीमेजवळ पाकिसातने हे लाँच पॅड तयार केले होते.

पाक आर्मीला जबरदस्त तडाखा, जिथून ड्रोन हल्ला करत होता पाकिस्तान, भारताने उडवले ते लाँच पॅड, Video पाहा
ऑपरेशन सिंदूरImage Credit source: गुगल
| Updated on: May 10, 2025 | 9:50 AM
Share

भारतीय लष्कराने जम्मूजवळ आज पाकिस्तानला मोठा धडा शिकवला. पाकिस्तानची फ्रंटलाईन पोस्ट आणि दहशतवादी लाँच पॅड भारताने नष्ट केले. सूत्रांच्या माहितीनुसार, हा तोच भाग आहे जिथून ट्यूब लाँच ड्रोनच्या माध्यमातून भारतावर हल्ले करण्यात येत होते. भारतीय लष्कराने केलेल्या प्रत्युत्तर कारवाईत हा लाँच पॅड नष्ट केला. या ठिकाणाहूनच दहशतवाद्यांसह पाकिस्तानी लष्कर भारतावर ड्रोन हल्ले करत होते. गुप्तहेर खात्याच्या अचूक माहितीनंतर हा लाँच पॅड नष्ट करण्यात आला.

26 शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला

पाकिस्तानकडून शुक्रवारी रात्री 26 शहरांवर ड्रोन हल्ला करण्याची तयारी करण्यात आली. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमपुढे ड्रोन आणि मिसाईल टिकली नाहीत. भारताच्या 26 शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. हवेतच ड्रोन आणि मिसाईलचा धुव्वा उडवण्यात आला. जम्मू-काश्मीर आणि पंजाबमधील अनेक ठिकाणी एकामागून एक स्फोट झाल्याचे आवाज ऐकू आले.

पाकिस्तानचे लष्कर आणि दहशतवाद्यांनी मिळून भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाकिस्तान लष्कराच्या मदतीने आंतरराष्ट्रीय सीमा रेषेजवळ दहशतवाद्यांनी हे लाँच पॅड्स तयार केले होते. भारताना पाकिस्तानविरोधात जोरदार कारवाई केली. केवळ हे लाँच पॅडच उद्ध्वस्त करण्यात आला नाही तर LoC वर होणारी शेलिंग, उखळी तोफांचा तळ सुद्धा नष्ट करण्यात यश आले आहे.

शुक्रवारी रात्री श्रीनगर विमानतळासह उत्तर आणि पश्चिम 26 ठिकाणांवर पाकिस्तान ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता. तो हाणून पाडण्यात आला. पाकिस्तानने गेल्या तिसर्‍या रात्री अनेक शहरांना लक्ष्य केले. उत्तरी काश्मीर ते बारामूला आणि गुजरातच्या भूजपर्यंत पाकिस्तानने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तुर्कीतून आणलेल्या 300 ते 400 ड्रोन नष्ट झाले.

गेल्या तीन दिवसांपासून पाकिस्तानकडून मध्यरात्री भारतावर हल्ले करण्यात येत आहे. पीओके आणि आंतरराष्ट्रीय सीमा रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानने रात्रीच्या वेळी भारतावर जवळपास 30 हून अधिक भागात ड्रोन द्वारे हल्ला चढवला. हा हल्ला भारताय लष्कराने परतावून लावला. पाकिस्तानने पंजाब, राजस्थान आणि हरियाणातील रहिवाशी भागांना लक्ष केले. हे सर्व हल्ले भारतीय लष्कराने परतावून लावले. सकाळी नवी दिल्ली, जम्मू, अमृतसर, पठाणकोट आणि जालंधरसह 12 हून अधिक शहरांवर हल्ले चढवले.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.