AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor विरोधात पाकड्यांचे बुनयान उल मरसूस; त्याचा अर्थ तरी काय? कुराणशी असं आहे कनेक्शन

Operation Bunyan ul Marsus : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात जबरदस्त कारवाई केली. त्याविरोधात पाकने बुनयान उल मरसूस हे ऑपरेशन सुरू केले आहे. हे नाव कुराणातील एका आयत, एका वचनावरून आले आहे.

Operation Sindoor विरोधात पाकड्यांचे बुनयान उल मरसूस; त्याचा अर्थ तरी काय? कुराणशी असं आहे कनेक्शन
भारत पाकिस्तान युद्धImage Credit source: गुगल
| Updated on: May 10, 2025 | 9:00 AM
Share

Banyan ul Marsoos : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि PoK मध्ये हल्ला चढवला. भारताच्या ऑपरेशन सिंदूरने पाकड्यांना घाम फोडला. त्यांचे 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले. तर 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले. पाकिस्तानने आता भारताविरोधात ऑपरेशन बुनयान उल मरसूस सुरू केले आहे. हे नाव कुराणातील एका आयत, एका वचनावरून आले आहे. त्याचा अर्थ ‘अतुट भिंत’ असा होतो. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी सशस्त्र दलांनी ऑपरेशन बुनयान उल मारसूस अंतर्गत सकाळी 12 हून अधिक भारतीय शहरांवर हल्ला केला आहे.

रात्रीतून 30 हून जास्त ड्रोन

यापूर्वी पाकिस्तानने मध्यरात्री पीओके आणि आंतरराष्ट्रीय सीमा रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानने रात्रीच्या वेळी भारतावर जवळपास 30 हून अधिक भागात ड्रोन द्वारे हल्ला चढवला. हा हल्ला भारताय लष्कराने परतावून लावला. यावेळी पाकिस्तानने पंजाब, राजस्थान आणि हरियाणातील रहिवाशी भागांना लक्ष केले. हे सर्व हल्ले परतावून लावले. सकाळी नवी दिल्ली, जम्मू, अमृतसर, पठाणकोट आणि जालंधरसह 12 हून अधिक शहरांवर हल्ले चढवले.

पाकड्यांचा मोठा आरोप

पाकिस्तानने जम्मू क्षेत्रात मोठा गोळीबार, मोर्टार आणि शेल द्वारे हल्ला केला. जम्मूमधील आरएसपुरा मध्ये या हल्ल्यात एक नागरिक जखमी झाला. पंजाबमधील फिरोजपूरामध्ये रहिवासी भागात पाकिस्तानने ड्रोन हल्ल्यामुळे एका घराला आग लागली. त्यात एका कुटुंबातील तीन लोक जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तर पाकिस्तानने बॅलेस्टिक मिसाईलने हल्ला केल्याचा आरोप पाकड्यांनी केला आहे.

पाकची ‘अतुट भिंत’

पाकिस्तानने भारताविरोधातील ऑपरेशनचे नाव ‘बुनयान उल मरसूस’ असे आहे. कुराण मधील एका आयतवरून ते नाव घेण्यात आला आहे. त्याचा अर्थ अतुट भिंत असा आहे. एकजूट होणे असा ही त्याचा अर्थ आहे. पाकिस्तानातील तीनही सैन्य दलातील एकता, ताकद आणि शिस्त याद्वारे भारताविरोधात कामगिरी बजावण्यासाठी ते इंगित करते. या ऑपरेशनअंतर्गत सकाळी नवी दिल्ली, जम्मू, अमृतसर, पठाणकोट आणि जालंधरसह 12 हून अधिक शहरांवर हल्ले चढवले.

महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.